आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या मेगा लिलावात (MEGA AUCTION) सहभागी होणाऱ्या ५९० खेळाडूंची अंतिम यादी बीसीसीआयने मंगळवारी (०१ फेब्रुवारी) जाहीर केली. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक संघ स्वतःची रणनीती तयार करू लागला आहे. मेगा लिलावात अनेक यष्टीरक्षक (wicket keeper) सामील आहेत. सध्या असे अनेक संघ आहेत, ज्यांच्याकडे यष्टीरक्षक नाहीय. याच कारणास्तव मेगा लिलावात यष्टीरक्षकांना खूप मागणी असणार आहे. मेगा लिलावात अनेक यष्टीरक्षक सहभागी होणार आहेत आणि त्यांच्यावर फ्रेंचायझी मोठी रक्कम खर्च करू शकतात.
आयपीएल २०२२ मध्ये अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन नवीन संघ सहभागी होणार आहेत. आता आयपीएलच्या मैदानात आठ ऐवजी १० संघ खेळताना दिसणार आहेत. संघानी पुढच्या हंगामासाठी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी पाहिली, तर यामध्ये काही संघ आहेत, ज्यांच्याकडे यष्टीरक्षक आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स या संघांकडे यष्टीरक्षक आहे. परंतु रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, कोलकाता नाइट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि अहमदाबाद या संघांकडे यष्टीरक्षक उपलब्ध नाहीय. हे सर्व संघ येत्या लिलावात एक चांगल्या यष्टीरक्षकांच्या शोधात असतील.
आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात सहभागी होणाऱ्या यष्टीरक्षकांची यादी –
क्विंटन डी कॉक (२ कोटी), ईशान किशन (२ कोटी), दिनेश कार्तिक (२ कोटी), अंबति रायडू (२ कोटी), सॅम बिलिग्स (२ कोटी), मॅथ्यू वेड (२ कोटी), जॉनी बेयरस्टो – (१.५कोटी), निकोलस पूरन – (१.५कोटी), ग्लेन फिलिप्स (१.५कोटी), जोशुआ फिलीप (१कोटी), ऋद्धिमान साहा (१कोटी), लिटन दास (५० लाख), निरोशन डिकवेला (५० लाख), आंद्रे फ्लेचर (५० लाख), रहमनुल्लाह गुरबेज (५० लाख), शाइ होप (५० लाख), हेनरिच क्लासेन (५० लाख), बेन मेक्डरमॉट (५० लाख), कुशल मेंडिस (५० लाख), कुशल परेरा (५० लाख), टिम सिफर्ट (५० लाख), शेल्डन जैक्सन (२०लाख), एन. जगदीशन (२० लाख), अनुज रावत (२०लाख), जितेश शर्मा (२०लाख), प्रभसिमरन सिंह (२०लाख), विष्णु सोलंकी (२०लाख), विष्णु विनोद (२०लाख).
दरम्यान, एका यष्टीरक्षकाला संघात सामील केल्यामुळे संघाला अनेक फायदे होतात. यष्टीरक्षकाच्या रूपात संघाचे कर्णधारपद सांभाळण्यासाठी एक चांगला पर्याय मिळतो. जरी यष्टीरक्षक संघाचा कर्णधार नसला, तरी यष्टीपाठी उभा राहून तो रणनीती तयार करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडतो. या कराणास्तव सध्या ज्या आयपीएल संघांकडे यष्टीरक्षक आहेत, ते स्वतः संघाचे नेतृत्वही करत आहेत.
यष्टीरक्षक फलंदाज, जे स्वतःच्या आयपीएल संघाचे कर्णधार आहेत
चेन्नई सुपर किंग्ज – एमएस धोनी (यष्टीरक्षक / कर्णधार)
दिल्ली कॅपिटल्स – रिषभ पंत (यष्टीरक्षक / कर्णधार)
लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (यष्टीरक्षक / कर्णधार)
राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन (यष्टीरक्षक / कर्णधार)
महत्वाच्या बातम्या –
‘रोहितसेने’तून बाहेर असलेल्या अश्विनचा अनोखा प्रयोग, एका हाताने फलंदाजीचा करतोय सराव- Video
आयपीएलने पालटले सिराजचे आयुष्य, पहिल्या कमाईतून कुटुंबासाठी घेतलेली सेकंड हॅंड कार; तर स्वतःसाठी…
मेगा ऑक्शनआधी फ्रॅंचाईजींची वाढली डोकेदुखी! बीसीसीआयने घालून दिले नवे नियम; वाचा सविस्तर