---Advertisement---

आयपीएलपूर्वी न्यूझीलंडचा संघ करणार बांगलादेश दौरा, असे आहे पूर्ण वेळापत्रक

On: गुरूवार, ऑगस्ट 5, 2021 4:46 PM
---Advertisement---

न्यूझीलंड आणि बांगलादेश क्रिकेट संघात ५ सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी सप्टेंबरमध्ये न्यूझीलंड संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. हे पाच सामने १ सप्टेंबर ते १० सप्टेंबर दरम्यान ढाकाच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. तत्पुर्वी उभय संघात एक टी२० सराव सामनाही होणार आहे.

बांगलादेशचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या मालिकेत व्यस्त आहे. सध्या ऑस्ट्रेलिया संघ आणि बांगलादेश संघात टी२० सामन्यांची मालिका खेळली जात असून बांगलादेश संघाने पहिले दोन्ही टी२० सामने जिंकले आहेत. न्यूझीलंड संघाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. अशा परिस्थितीत न्यूझीलंड संघ बांगलादेश दौऱ्यावर आगामी टी२० विश्वचषकाची तयारी करणार आहे.

बांगलादेशविरुद्धच्या टी२० मालिकेनंतर न्यूझीलंडचे खेळाडू आयपीएलसाठी यूएईला रवाना होणार आहेत. आयपीएल १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि न्यूझीलंड क्रिकेटने अगोदरच सांगितले आहे की, त्यांचे खेळाडू दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहेत.

न्यूझीलंड क्रिकेटचे प्रमुख डेव्हिड व्हाईट यांनी स्पष्ट केले होते की, ‘न्यूझीलंडचे खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध राहणार आहेत. केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट, जिम्मी नीशम आणि लॉकी फर्ग्युसन आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी उपलब्ध असतील.’

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच न्यूझीलंड आणि पाकिस्तानमध्ये मर्यादित षटकांची मालिका खेळली जाणार आहे. परंतु हा दौरा तेव्हाच होईल जेव्हा न्यूझीलंड पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत पूर्णपणे समाधानी असेल. पाकिस्तानने या दौऱ्यावर न्यूझीलंडला दोन अतिरिक्त टी२० सामने खेळण्याचीही विनंती केली होती.

बांगलादेशबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी२० सामने खेळण्याचे आयोजन केले होते. परंतु दोन्ही मंडळांनी परस्पर हा दौरा २०२३ पर्यंत पुढे ढकलला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोतील वृत्तानुसार, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने कोविड-१९ प्रोटोकॉलमुळे हा दौरा २०२३ पर्यंत पुनर्निर्धारित करण्याचा निर्णय घेतला आहे.

असे आहे न्यूझीलंडच्या बांगलादेश दौऱ्याचे वेळापत्रक
सराव टी२० सामना – २९ ऑगस्ट
पहिला टी२० – १ सप्टेंबर
दुसरा टी२० – ३ सप्टेंबर
तिसरा टी२० सामना – ५ सप्टेंबर
चौथा टी२० सामना – ८ सप्टेंबर
पाचवा टी२० सामना – १० सप्टेंबर

महत्त्वाच्या बातम्या-

ENG vs IND, 1st Test, 2nd Day Live: दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात, भारताचे सलामीवीर उतरले मैदानात

Video: बेअरस्टोच्या विकेटच्या रिव्ह्यूसाठी शमी-शार्दुलने असं मनवलं ‘कर्णधार’ कोहलीला, स्वत:च केलाय खुलासा

रिषभच्या त्या कृत्याला पाहून चाहत्यांना आली धोनीची आठवण; म्हणाले, ‘हळू हळू शिकतोय’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---