वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर एक मजेदार घटना घडली. डावाच्या ७८ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कॅरेबियन संघाचा कर्णधार क्रेग ब्रेथवेटने मोठी चूक केली आणि तो ९७ धावांवर धावबाद झाला.
त्याच्या धावबादचा निर्णय तिसऱ्या अंपायरने देत असताना जे घडले, त्यामुळे हसू आल्याशिवाय राहाणार नाही. झाले असे की वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात फलंदाजी करत होता, त्यावेळी ७८ व्या षटकात ब्रेथवेट धावबाद झाला, तेव्हा मैदानावरील पंचांनी त्याच्या विकेटचा निर्णय घेण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. क्रेग ब्रेथवेटला तिसऱ्या पंचांनी बाद झाल्याचे घोषित केले. मात्र, दरम्यान स्क्रीनवर थोडासा गोंधळ झाला आणि आऊट शो दाखवण्यापूर्वी स्क्रीनवर दुसरा टॅब उघडला.
यानंतर, तो टॅब पटकन काढला गेला आणि नंतर स्क्रीनवर आऊट शो दाखवला गेला. एका वापरकर्त्याने कमेंट केली आणि लिहिले की, “मला असे वाटले की गाणं लावायला लागले आहेत.” दुसर्या वापरकर्त्याने लिहिले की, “आभार आहे की, हे समोर आले आणि आणखी काही असते तर.” दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले की, “मी आजपर्यंत इतक्या जोरात कधी हसलो नाही.”
https://www.facebook.com/100060136983933/videos/380287173445867/?t=6
दुसरीकडे, जर आपण सामन्याबद्दल बोललो तर, दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याचा दुसरा दिवस कॅरिबियन संघाच्या नावावर होता. क्रेग ब्रेथवेटच्या ९७ व्यतिरिक्त जेसन होल्डरनेही ५८ धावांचे योगदान दिले. पहिल्या डावात पाकिस्तानच्या पहिल्या डावातील २१७ धावांच्या प्रत्यूत्तरात वेस्ट इंडिजने दिवसाचा खेळ संपल्यावर ८ गडी गमावून २५१ धावा केल्या.
कसोटी क्रिकेटमध्ये ९० पेक्षा जास्त धावा करून शतकापूर्वी धावबाद होणारा ब्रेथवेट वेस्ट इंडिजचा पहिला कर्णधार बनला. एवढेच नाही तर गेल्या २० वर्षात प्रथमच असे घडले की, वेस्ट इंडिजचा एक फलंदाज ९० पेक्षा जास्त धावा केल्यावर शतक झळकावण्याआधी धावबाद झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘पंतच्या फलंदाजीत दिसते गिलख्रिस्टची झलक’, माजी इंग्लिश क्रिकेटपटूकडून कौतुक