चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघ दाखल झाला आहे भारतीय संघाने बांगलादेश आणि पाकिस्तान संघाचा पराभव करत अंतिम 4 संघात स्थान पक्के केले आहे. भारतीय संघाशिवाय अ गटातील न्युझीलँड संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्याचबरोबर साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया ब गटातून उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. आता हा प्रश्न उपस्थित होत आहे की भारतीय संघासमोर उपांत्य फेरीच्या सामन्यात कोणता संघ असेल? भारतीय संघाला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागेल की साउथ आफ्रिकेचा हे जाणून घेऊया.
आज भारत न्यूझीलंड सामन्यानंतर हे स्पष्ट होईल की उपांत्य फेरीत कोणत्या संघाचा सामना कोणत्या संघासोबत होईल. तत्पूर्वी भारतीय संघाचा माजी खेळाडू दिनेश कार्तिकने भारतीय संघाच्या उपांत्य फेरी सामन्यापूर्वी त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
क्रिकबज सोबत बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाने चांगले प्रदर्शन केले आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने त्यांचा विजयाची लय राखली आहे. भारताने बांगलादेश शिवाय पाकिस्तानला सुद्धा पराभूत केले. भारतीय संघ चांगलं क्रिकेट खेळत आहे. जर मला भारतीय संघाविरुद्ध उपांत्य फेरीत कोणत्या संघाला निवडायचे असल्यास मी ऑस्ट्रेलियाचे नाव घेईल. मला वाटते की भारतीय संघाने उपांत्य फेरीतील सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळावा. दिनेश कार्तिकचे म्हणणं आहे की भारतीय फलंदाजां पेक्षा गोलंदाज चांगलं प्रदर्शन करत आहेत.
आज भारत – न्यूझीलंड संघात सामना दुबईमध्ये सामना खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर उपांत्य फेरीतील संघ समोर येतील. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फॉरमॅटनुसार अ गटातील टॉप संघ ब गटातील दुसऱ्या नंबर वर असणाऱ्या संघाविरुद्ध खेळेल. तसेच ब गटातील टॉप संघ अ गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघासोबत उपांत्य फेरीतील सामना खेळेल. पण जर न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला आज पराभूत केले, तर न्यूझीलंड टॉपच्या स्थानी पोहोचेल आणि त्यानंतर न्युझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीतील सामना खेळला जाईल. तसेच भारतीय संघाला त्यांचा उपांत्य फेरीतील सामना साऊथ आफ्रिका विरुद्ध खेळावा लागेल.
हेही वाचा
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! रिझवान बाद, बाबर-शाहीनही बाहेर; हा नवा स्टार बनेल कर्णधार?
IND vs NZ: किवी संघाने जिंकला टाॅस, टीम इंडियात मोठा बदल, पाहा प्लेइंग 11
विराटसाठी 2 मार्च खास, 2008 मध्ये केलेला हा पराक्रम, आजही सामना गाजवणार?






