शुक्रवारी (४ जानेवारी) चीनमध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाली. नावातूनच समजते की, ही स्पर्धा हिवाळ्यात खेळली जाते. यावर्षी या स्पर्धेचे आयोजन चीनच्या बीजिंग शरहात केले गेले आहे. स्पर्धेचे हे २४ वे वर्ष आहे. यावर्षी स्पर्धेची सुरुवात जोरदार झाली. बिजिंगमध्ये जबरदस्त आतिशबाजी आणि रंगारंग कार्यक्रमांसह हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला.
उद्घाटन कार्यक्रमात हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांचे सर्व खेळाडू स्वतःच्या देशाचा झेंडा घेऊन मार्च करतात. भारताकडून यावर्षी फक्त एक खेळाडू हिवाळी ऑलिम्पिसाठी निवडला गेला आहे. स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात जेव्हा भारताचा हा एकमात्र खेळाडू तिरंगा घेऊन येतो, तो क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा होता. जम्मू-काश्मिरचा मोहम्मद आरिफ हा एकमात्र खेळाडू आहे, जो हिवाळी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. स्पर्धेच्या हा उद्घाटन कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षकही मोठ्या प्रमाणात आले होते.
✨🎇Skies over the National Stadium are illuminated by spectacular fireworks, which mark the start of the Beijing 2022 Olympic Winter Games.🥰🎊#Beijing2022 #Olympics#TogetherForASharedFuture#OpeningCeremony #fireworks
📸:GettyImages pic.twitter.com/9JTY8q13mv— Beijing 2022 (@Beijing2022) February 4, 2022
🔥✨The Olympic flame has been lit inside the beautiful snowflake at the Beijing 2022 Olympic Winter Games #OpeningCeremony.
💓💪Such an innovative and inspiring moment to see!#Beijing2022 #Olympics #OpeningCeremony#TogetherForASharedFuture
📸: GettyImages pic.twitter.com/L1zhAB1BOw— Beijing 2022 (@Beijing2022) February 4, 2022
हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी यापूर्वी क्वालिफाय स्पर्धा मोहम्मद आरिफने पार केली आणि स्पर्धेत सहभागी होऊ शकला. आरिफ स्लैलम आणि जाइंट स्लैलम स्पर्धेत सहभाग घेणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात त्याने स्वतः देशाचा तिरंगा फडकवला आणि ध्वजवाहक राहिला. आरिफसोबत त्याचा सपोर्ट स्टाफही चीनमध्ये आहे.’
Children carry dove lamps, singing and dancing in the arena💓✨
They symbolize the celebration of unity and strength at Beijing2022 and peace around the world.🎊💪What a magical moment to capture!🥰#Beijing2022 #Olympics #BingDwenDwen#TogetherForASharedFuture
📸: GettyImages pic.twitter.com/D7onXczxki— Beijing 2022 (@Beijing2022) February 4, 2022
🌃🌐Tonight the world will celebrate together under the Olympic rings.
⬆️Let's go faster, aim higher↗️ and grow stronger💪 by standing together at Beijing 2022 Olympic Winter Games.
#Beijing2022 #Olympics #OpeningCeremony#TogetherForASharedFuture
📸 GettyImages pic.twitter.com/3o5ioueqD8— Beijing 2022 (@Beijing2022) February 4, 2022
आपल्यापैकी अनेकांना हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेविषयी माहिती नसते. काहींनी याविषयी ऐकलेही असेल, पण स्पर्धेविषयी संपूर्ण माहिती मात्र अनेकांकडे नसते. हिवाळी ऑलिम्पिक या नावातच सर्वकाही सांगितले जात आहे. ही स्पर्धा हिवाळ्यात आयोजित केली जाते. स्पर्धेतील सर्व खेळ हे बर्फात खेळले जातात. यामध्ये आइस स्केटिंग, आइस हॉकी, फिगर स्केटिंग, स्कीइंग आणि स्नोबर्डिंग यासारख्या खेळांचा मावेश आहे. स्पर्धा २० फेब्रुवारीपर्यंत खेळली चालणार आहे. यामध्ये भारत, चीन, अमेरिका यांच्यासह एकूण ९१ देश सहभाग घेणार आहेत.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएलचा पहिला लिलाव गाजवणारे ‘ते’ तिघे भारतीय सध्या करतात काय? घ्या जाणून
केरला ब्लास्टर्सचा निसटता विजय; नॉर्थ ईस्टला हरवत दुसऱ्या स्थानी झेप
हरियाणा स्टीलर्सचा बंगालला घाव! कर्णधार विकास कंडोलाची धडाकेबाज कामगिरी