भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्याला संयमशील क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाते. पण पंड्याचे पंखुडी शर्मासोबतचे प्रेम प्रकरण कोणत्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही.
पंखुडीने मोठा खुलासा करत सांगितले की, “पंड्याने तिला रात्री २ वाजता मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) अर्ध्यापेक्षा जास्त खेळाडूंसमोर प्रपोज (Propose) केले होते. त्यानंतर काही दिवसांनी आमचे लग्न झाले होते.”
मॉडेल आणि इव्हेंट मॅनेजर असलेल्या पंखुडीने क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मुंबई इंडियन्सने २०१७साली आयपीएलचे विजेतेपद पटकाविले होते. यावेळी पंड्याने अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळवला होता. तो त्याच्यासाठी दुप्पट आनंदाचा दिवस होता. सामन्यांतर रात्री तो मस्त गाणे गुणगुणत हॉटेलच्या खोलीत पोहोचला. त्यावेळी त्याचा भाऊ हार्दिक पंड्यादेखील (Hardik Pandya) खोलीत उपस्थित होता.”
“पंड्याच्या पाठोपाठ मुंबई इंडियन्सचे बरेच खेळाडूही तिथे पोहोचले. अशात पंड्याने मला उभे रहायला सांगितले. मला त्याच्या नियोजनाविषयी काहीही कल्पना नव्हती. जशी मी उभी राहिले, तसे त्याने माझ्यासोबत लग्न करशील का? असा प्रश्न विचारला. त्याचे ते रूप बघून मी चकित झाले होते. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की पंड्या मला एवढ्या रोमँटिक पद्धतीने प्रपोज करेल,” असे पंखुडी (Pankhuri) यावेळी म्हणाली.
पुढे आपल्या संघसहकाऱ्यांसमोर पंखुडीला प्रपोज करणे ठीक होते का? जर तिने नकार दिला असता तर या प्रश्नाचे उत्तर देत पंड्या (Krunal Pandya) म्हणाला, “जेव्हा आपण फलंदाजी करत असतो तेव्हा आपल्याला माहिती नसते की गोलंदाज पुढील चेंडू कुठे टाकेल. हेदेखील त्याप्रमाणेच होते. तसे तर मला पूर्ण विश्वास होता की पंखुडी मला होकारच देणार. त्यानंतर डिसेंबरमध्ये आम्ही लग्न केले,”
आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये २८ वर्षीय पंड्याने १८ सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने ४ नेव्हेंबर २०१८मध्ये कोलकाता येथील वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत १८ सामन्यात १२१ धावा केल्या आहेत. तर, १४विकेट्स घेतल्या आहेत. त्याने त्याचा शेवटचा टी२० सामना ७ नोव्हेंबर २०१९ला बांग्लादेशविरुद्ध खेळला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-तब्बल ३ वर्ष व ७० वनडेनंतर त्या खेळाडूने केली होती शतकी खेळी






