भारतीय संघामध्ये असे अनेक खेळाडू आहेत, जे मजा-मस्करी करत असतात. परंतु सर्वात जास्त मस्करी करणारा कोणता खेळाडू असेल तर तो फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहल म्हणता येईल. चहलमधील एक खास गोष्ट म्हणजे तो नेहमीच मस्करी करण्याच्या मूडमध्ये असतो.
सध्या कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) क्रिकेट पूर्णपणे बंद पडले आहे. त्यामुळे खेळाडू आपापल्या घरात वेळ घालवत आहेत. त्याचबरोबर ते सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. यामध्ये चहलही टिक-टॉक आणि इंस्टाग्राम लाईव्ह करत असतो.
चहलने (Yuzvendra Chahal) जतीन सप्रूबरोबरच्या (Jatin Sapru) चर्चेत आपल्या लाईफ पार्टनरविषयी खुलासा केला आहे.
चहलला काणत्याही गोष्टीबद्दल विचारले की तो काहीही न लपवता सांगतो. अशाच प्रकारे त्याला आपल्या भविष्यातील पत्नीविषयी विचारले असता, त्याने ३ गुण असणारी मुलगी आवडत असल्याचे सांगितले.
चहलने यावेळी आपल्या भविष्यातील पत्नीबद्दल ३ गुण (3 Qualities) सांगितले की, “ती मुलगी मला समजून घेणारी असावी. तसेच माझ्याबरोबर टिक-टॉक व्हिडिओ (Tik-Tok) बनवणारी मुलगी मला आवडते. त्याचबरोबर माझ्या कुटुंबाच आदर करणारी असावी. हे ३ गुण असणाऱ्या मुलीशी मी लग्न करेल.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-क्रिकेट सोडून भारताचा स्टार क्रिकेटपटू झालाय कराटे प्लेअर
-शेवटचे २ पर्याय, आयपीएलच्या आयोजनासाठी बीसीसीआयकडे केवळ हे पर्याय