---Advertisement---

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमची भारत, इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनाही भूरळ; पाहा खास ट्विट्स

On: सोमवार, फेब्रुवारी 22, 2021 6:00 AM
---Advertisement---

अहमदाबाद। इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील सध्या भारत-इंग्लंड संघात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील शेवटचे दोन सामने आणि त्यानंतर होणारी ५ सामन्यांची टी२० मालिका अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) होणार आहे. त्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू अहमदाबादला पोहचले आहेत आणि खेळाडूंनी सरावही सुरु केला आहे.

जगातील सर्वात मोठे स्टेडियम
मोटेरा स्टेडियम हे पुर्नबांधणी केलेले स्टेडियम असून आता ते जगातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणून ओळखले जाते. त्यामुळे भारत आणि इंग्लंड संघात २४ फेब्रुवारीपासून सुरु होणारा तिसरा कसोटी सामना हा पुर्नबांधणी केलेल्या मोटेरा स्टेडियमवर होणारा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. विशेष म्हणजे हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. त्यानंतर ४ मार्चपासून याच स्टेडियमवर चौथा कसोटी सामनाही सुरु होणार आहे. यानंतर १२ ते २० मार्चदरम्यान ५ टी२० सामने या स्टेडियमवर पार पडतील.

मोटेरा स्टेडियम जवळजवळ ६३ एकर जागेत बनले आहे. त्याचबरोबर या स्टेडीयममध्ये ३ प्रॅक्टीस ग्राउंड, १ इनडोअर क्रिकेट ऍकेडमी, क्लबहाउस आणि स्विमिंग पूल तसेच ७३ कॉर्पोरेट बॉक्स याचाही समावेश आहे. हे स्टेडियम बांधण्यासाठी अंदाजे ७०० कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. या स्टेडियमची तब्बल १ लाख १० हजार आसन क्षमता आहे.

खेळाडूंना मोटेरा स्टेडियमची भूरळ –
भारत आणि इंग्लंड संघांच्या खेळाडूंना या स्टेडियमने भूरळ पाडली आहे. अनेक क्रिकेटपटूंनी या स्टेडियममधील फोटो आणि व्हिडिओ ट्विट केले आहेत. रिषभ पंतने या स्टेडियमचे फोटो शेअर करताना लिहिले आहे की ‘नवीन सुविधांसह तयार झालेल्या मोटेरा स्टेडियममध्ये मस्त वाटत आहे. अहमदाबादमध्ये क्रिकेटसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा पाहून चांगले वाटत आहे. २४ फेब्रुवारीला या मैदानात पाऊल ठेवण्यास उत्सुक आहे.’

https://twitter.com/RishabhPant17/status/1362788046488309763

तसेच कुलदीप यादवनेही म्हटला आहे की ‘काय मस्त स्टेडियम आहे. अशा सुविधा तयार करण्यासाठी योगदान दिलेल्या सर्वांनी चांगले काम केले आहे. या स्टेडियममध्ये खेळण्याचा अनुभव शानदार असेल.’

https://twitter.com/imkuldeep18/status/1362984375940378625

याबरोबरच हार्दिक पंड्यानेही या स्टेडियममध्ये येऊन शानदार वाटत असल्याचे व्यक्त केले. त्याचबरोबर स्टुअर्ट ब्रॉड, केविन पीटरसन, जेम्स अँडरसन यांनीही या स्टेडियमचे कौतुक केले आहे.

https://twitter.com/hardikpandya7/status/1362749937188970497

https://twitter.com/KP24/status/1362797770227273730

https://twitter.com/StuartBroad8/status/1362711600742862849

https://twitter.com/jimmy9/status/1363183042433478658

https://twitter.com/englandcricket/status/1362696187451686912

https://twitter.com/benstokes38/status/1362763512628408321

https://twitter.com/englandcricket/status/1362768094419066884

https://twitter.com/RishabhPant17/status/1362823374230089728

https://twitter.com/y_umesh/status/1363494612292104195

https://twitter.com/mayankcricket/status/1363376490105118722

https://twitter.com/cheteshwar1/status/1363132905271173122

https://twitter.com/Sundarwashi5/status/1363104760534999040

https://twitter.com/BCCI/status/1362730961960456194

https://twitter.com/BCCI/status/1362376656900419585

मोटेरा स्टेडियमवर सय्यद मुश्ताक अलीचे सामने –
काही दिवसांपूर्वीच या स्टेडियमवर भारतातील देशांतर्गत स्पर्धा सय्य्द मुश्ताक अली टी२० ट्रॉफीच्या बाद फेरीचे आयोजन करण्यात आले होते. याच स्टेडियमवर तमिळनाडूने बडोद्याचा पराभव करत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते.

अहमदाबादला होणारे भारत – इंग्लंड सामने

कसोटी-
२४-२८ फेब्रुवारी – तिसरा कसोटी सामना, वेळ – दुपारी २.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
४-८ मार्च – चौथा कसोटी सामना, वेळ – सकाळी ९.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

टी२० मालिका
१२ मार्च – पहिला टी२० सामना, वेळ – संध्याकाळी ७.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
१४ मार्च – दुसरा टी२० सामना, वेळ – संध्याकाळी ७.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
१६ मार्च – तिसरा टी२० सामना, वेळ – संध्याकाळी ७.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
१८ मार्च – चौथा टी२० सामना, वेळ – संध्याकाळी ७.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
२० मार्च – पाचवा टी२० सामना, वेळ – संध्याकाळी ७.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

महत्त्वाच्या बातम्या –

खेळपट्टीवर टीका करणाऱ्या इंग्लंडच्या दिग्गजांना ब्रॉडचा घरचा आहेर; म्हणाला, “मायदेशात खेळत असताना…”

संगकाराला डायरेक्टर करताच राजस्थान रॉयल्सने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

टीम इंडियात निवड होताच सुर्यकुमारची तुफानी खेळी; मुंबईला मिळवून दिला विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---