---Advertisement---

‘…तर धोनीने मर्यादीत क्रिकेटमधील जवळपास सर्वच मोठे विक्रम मोडले असते’, गंभीरचा विश्वास

On: रविवार, मार्च 20, 2022 6:04 PM
Gautam-Gambhir-MS-Dhoni
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी दिग्गज सलामीवीर गौतम गंभीर त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. गंभीर आणि भारताचा महान कर्णधार एमएस धोनी यांच्या वादाचीही अनेकदा चर्चा होत असते. परंतु, गंभीरने स्वतः आता या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. गंभीरने सांगितल्याप्रमाणे एमएस धोनी आणि त्याचे संबंध अगदी चांगले आहेत आणि धोनीविषयी त्याच्या मनात आदर आहे. गंभीरने यावेळी यावेळी धोनीच्या फलंदाजी क्रमाविषयी मोठी प्रतिक्रिया दिली.

क्रिकेटमध्ये आपण पाहतो की, अनेकदा मोठे विक्रम घडवणारे फलंदाज वरच्या फळीत खेळत असतात. परंतु, भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MSDhoni) मात्र संघासाठी एका फिनिशरच्या रूपात फलंदाजी करायचा. गौतम गंभीर (Gauta, Gambhir) याने धोनीच्या फलंदाजी क्रमांकावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. गंभीरच्या मते धोनीने जर वरच्या फळीत फलंदाजी केली असती, तर त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्व विक्रम मोडले असते.

समालोचक जतिन सप्रू यांच्या यू-ट्यूब चॅनलवर गंभीरने मुलाखत दिली. यावेळी गंभीर म्हणाला, जर एमएस धोनी वरच्या फळीत फलंदाज करत असता, तर त्याने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये सर्व रेकॉर्ड्स तोडले असते. गंभीरने सांगितले, जर त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली असती, तर त्याने सर्व विक्रम मोडले असते. आपण तिसऱ्या क्रमांकावरील अनेक महान फलंदाजांची चर्चा करतो. पण जर धोनी पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये या क्रमांकावर खेळला असता, तर त्याने सर्व विक्रम मोडले असते.

‘माझ्या मनात धोनीविषयी खूप सन्मान आहे आणि नेहमीच राहील. मी आधीही ही गोष्ट अनेकदा सार्वजनिक ठिकाणी बोललो आहे आणि आता पुन्हा सांगत आहे. मी १३८ कोटी लोकांपुढे सांगू शकतो की, जर धोनीला कधी गरज पडली, तर त्याच्या शेजारी उभा राहणारा पहिला व्यक्ती मी स्वतः असेलट, असेही गंभीर मुलाखतीत म्हणाला. मुलाखतीदरम्यान गंभीरने धोनी आणि त्याच्यातली वादाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

महत्वाच्या बातम्या –

Womens World Cup 2022: न्यूझीलंड संघाची कर्णधार चालू सामन्यातून बाहेर; कारण घ्या जाणून

IPL2022| धोनीच्या चेन्नईची चिंता वाढली, ‘या’ प्रमुख अष्टपैलू खेळाडूला अद्याप मिळाला नाही व्हिसा

पंजाब किंग्ज ठरणार नवीन आयपीएल चॅम्पियन? संघाचा नवा कर्णधार मयंक अगरवाल म्हणतोय…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---