पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी सर्व १६ संघांची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच टी२० विश्वचषक खेळेल. २००७ पासून भारतीय संघाने २००७ पासून विश्वचषक जिंकलेला नाही. भारतीय संघ २०१३ नंतर पहिल्या आयसीसी ट्रॉफीची वाट पाहतोय. इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गन हा स्पर्धा खेळणाऱ्या १६ संघांतील सर्वात अनुभवी कर्णधार आहे. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान यूएई आणि ओमानमध्ये विश्वचषकाचे सामने होणार आहेत.
कोणताही विश्वविजेता कर्णधार नाही खेळणार
युएई येथे होणारा हा विश्वचषक सातव्यांदा खेळला जाईल. आतापर्यंत केवळ पाच संघांनी जेतेपद पटकावले आहे. वेस्ट इंडिजचा माजी डॅरेन सॅमी आणि भारताचा माजी एमएस धोनी कर्णधार म्हणून सर्वाधिक दोन-दोन अंतिम सामने खेळले आहेत. सॅमीने दोन्ही अंतिम सामने जिंकले आहेत, तर धोनी फक्त २००७ मध्ये संघाला विजेतेपद मिळवून देऊ शकला होता. २०१४ मध्ये लसिथ मलिंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने अंतिम फेरीत भारताचा पराभव केलेला. याशिवाय इंग्लंडचा पॉल कॉलिंगवूड आणि पाकिस्तानचा युनुस खान यांनी कर्णधार म्हणून प्रत्येकी एकदा विजेतेपद पटकावले आहे. यावेळी हे पाचही कर्णधार विश्वचषकात दिसणार नाहीत.
विराटच्या नेतृत्वात खेळणार भारतीय संघ
विराट कोहलीकडे टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, एमएस धोनीला संघाचा मार्गदर्शक बनवण्यात आले आहे. धोनीच्या नावावर ४ टी२० विजेतेपदे आहेत. विश्वचषका व्यतिरिक्त त्याने तीन वेळा आयपीएलचे जेतेपदही पटकावले आहे. रोहित शर्मा संघाचा उपकर्णधार असून, त्याने तब्बल पाच वेळा मुंबई इंडियन्सला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे. रिषभ पंत, भुवनेश्वर कुमार व केएल राहुल या सर्वांना आयपीएलमध्ये नेतृत्व करण्याचा अनुभव असल्याने, विराट कोहलीला याचा फायदा होईल. त्यामुळे भारताला विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
आयसीसी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, आर.अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शमी.
राखीव- शार्दुल ठाकूर, दीपक चाहर व श्रेयस अय्यर.