भारतात क्रिकेटची आवड लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आहे. जेव्हा जेव्हा प्रत्येकजण सामना पाहतो तेव्हा फलंदाजांच्या फलंदाजीमधून निघालेले चौकार आणि षटकार पाहणे प्रत्येकालाच आवडते. आवडत्या फलंदाजाबद्दल प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच भावना असते. तसेच जेव्हा फलंदाज एखादा शॉट खेळतो आणि त्यावर स्टेडियममध्ये उपस्थित असणारे प्रेक्षक टाळ्या वाजवतात तेव्हा खेळाडूचे हृदय आनंदाने भरते.
वनडे, टी२०मध्ये चौकार, षटकारांची आतिषबाजी होणे प्रेक्षकांसाठी नवीन नाही. पण कसोटी क्रिकेटमध्ये मात्र चौकार आणि षटकार सातत्याने मारले जात नाहीत. त्यातही कसोटीत फलंदाजांकडून षटकार मारलेला अगदी क्वचितच पहायला मिळतात. पण कसोटीत असे काही क्रिकेटपटू झाले, ज्यांनी कसोटीतही अनेक षटकार मारण्याचा पराक्रम केला. या लेखातही कसोटीत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या १० फलंदाजांबद्दल जाणून घेऊ.
या १० खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये ठोकले आहेत सर्वाधिक षटकार
१०. मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) – ८२ षटकार
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन कसोटी स्वरूपात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे. सलामीवीर म्हणून या खेळाडूने उत्तम कामगिरी करून चाहत्यांच्या मनावर राज्य केले.
हेडनने खेळलेल्या १०३ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ८२ षटकार ठोकले. त्याने कसोटीमध्ये ५०.७३ च्या सरासरीने ८६२५ धावा केल्या आहेत. तसेच,त्याच्या या १५ वर्षाच्या कसोटी कारकीर्दीत त्याने ३० शतके आणि २९ अर्धशतके झळकावली आहेत.
९. अँड्र्यू फ्लिंटॉफ (Andrew Flintoff) – ८२ षटकार
इंग्लंडच्या या माजी फलंदाजाने आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतही षटकारांचा वर्षाव केला. त्यामुळे तो या यादीत ९ व्या क्रमांकावर आहे. या अष्टपैलू खेळाडूने ७९ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ८२ षटकार ठोकले. फ्लिंटॉफची क्रिकेट कारकीर्द उत्कृष्ट होती.
गोलंदाजीशिवाय फ्लिंटॉफने फलंदाजीत ३१.७७ च्या सरासरीने ३८४५ धावाही केल्या. त्याने ५ शतके आणि २६ अर्धशतके झळकावली. २००४ मधील बर्मिंघॅम येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात १९१ चेंडूत १६७ धावांची सर्वोत्कृष्ट खेळी केली होती.
फ्लिंटॉफचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याने खेळलेल्या प्रत्येक कसोटी सामन्यात कमीतकमी एक षटकार लगावला होता.
८. व्हिवियन रिचर्ड्स (Vivian Richards) – ८४ षटकार
वेस्ट इंडीजचे माजी दिग्गज खेळाडू विव्हियन रिचर्ड्स यांचे नावही या यादीत आहे. रिचर्ड्स हे मोठं-मोठे फटके खेळण्यातही पारंगत होते. आपल्या गोलंदाजीच्या सहाय्याने फलंदाजांच्या विकेट घेणाऱ्या रिचर्ड्स यांनी फलंदाजी करून विरोधकांना चोख उत्तर देखील दिले आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणार्या खेळाडूंच्या यादीत विव्हियन रिचर्ड्स आठव्या क्रमांकावर आहेत. रिचर्ड्सने त्यांच्या कसोटी कारकीर्दीत ८४ षटकार ठोकले आहेत.
७. ख्रिस केर्न्स (Chris Cairns) – ८७ षटकार
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये न्यूझीलंडचा ख्रिस केर्न्स ७ व्या क्रमांकावर आहे. ख्रिसने वनडे क्रिकेटसाठी न्यूझीलंड संघाचे नेतृत्वही केले आहे.
ख्रिसने कसोटी क्रिकेटमध्ये ८७ षटकार ठोकले. या अष्टपैलू क्रिकेटपटूला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत बरीच दुखापत झाली. पण या खेळाडूच्या खेळामध्ये दुखापतींमुळे कधीही व्यत्यय आला नाही. तो त्याच जोशाने पुन्हा दिसायचा.
न्यूझीलंडच्या क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडूंच्या यादीत समावेश असलेल्या ख्रिस केर्न्सने बॅट आणि बॉल या दोन्ही उत्कृष्ट कामगिरीमुळे अनेकवेळा एकट्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिले आहेत.
६. ब्रायन लारा (Brian Lara) – ८८ षटकार
जेव्हा जेव्हा वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची नावे घेतली जातात तेव्हा ब्रायन लाराचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते. मोठे शॉट्स खेळण्यासाठी ओळखला जाणारा माजी कर्णधार ब्रायन लारा. या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे. त्याने कसोटी कारकीर्दीत खेळलेल्या २३२ डावांमध्ये एकूण ८८ षटकार ठोकले.
ब्रायन लाराची क्रिकेट कारकीर्द उत्कृष्ट होती. या चमकदार फलंदाजाने क्रिकेटच्या इतिहासात अनेक विक्रम नोंदवले आहेत.
ब्रायन लारा स्टाईलिश क्रिकेट खेळण्यासाठीही ओळखला जातो. या डावखुऱ्या फलंदाजाने कसोटीत नाबाद ४०० धावा काढून इतिहास रचला. क्रिकेट इतिहासात नाबाद ४०० धावांची खेळी करणारा तो एकमेव खेळाडू आहे.
५. वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) – ९१ षटकार
भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी सलामीवीर वीरेंद्र सेहवागलाही फलंदाजी करताना चेंडू सीमारेषा बाहेर मारायला आवडत असे. वीरूने खेळलेल्या १०४ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ९१ षटकार ठोकले.
सेहवागने भारतीय संघाकडून १०४ कसोटी सामन्यांच्या १८० डावांमध्ये ४९.३४ च्या सरासरीने ८५८६ धावा केल्या. तसेच त्याने कसोटीत २३ शतकं आणि ३२ अर्धशतके केली आहेत. त्याची सर्वोत्कृष्ठ कामगिरी ३१९ धावा ही आहे.
४. जॅक कॅलिस (Jacques Kallis ) – ९७ षटकार
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक कॅलिस या दिग्गज खेळाडूचाही समावेश या यादीत आहे. त्याने कसोटीत एकूण ९७ षटकार लागावले आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी जॅक कॅलिस हा मोलाचा खेळाडू होता. कॅलिसने आपल्या कसोटी कारकीर्दीत ५५.३७ च्या सरासरीने १३२८९ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ४५ शतके, ५८ अर्धशतके आणि २ दुहेरी शतकांचा समावेश आहे. त्याने १८ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत एकूण १६६ सामने खेळले.
३. ख्रिस गेल (Chris Gayle) – ९८ षटकार
‘युनिव्हर्सल बॉस’ म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडीजचा अनुभवी ख्रिस गेल हा मोठे षटकार मारण्यास सक्षम असल्याचे मानले जाते. क्रिकेटचा कोणताही प्रकार असो. त्याच्या फलंदाजीमधून मोठे फटके पाहायला मिळाले आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणार्या खेळाडूंच्या यादीत ९८ षटकारांसह तो तिसर्या क्रमांकावर आहेत. १०३ सामन्यांच्या १८२ डावांमध्ये गेलने ४२.१८ च्या सरासरीने ७२१२ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये १५ शतके आणि ३७ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याची सर्वोत्तम खेळी ३३३ धावा आहे
२.अॅडम गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) – १०० षटकार
जेव्हा जेव्हा जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक-फलंदाजाची चर्चा होते तेव्हा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलक्रिस्ट यांचे नाव पहिले घेतले जाते. गिलख्रिस्टची एक यष्टीरक्षक म्हणूनच नाही तर एक फलंदाज म्हणूनही उत्तम कामगिरी झाली आहे.
गिलख्रिस्टने आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीत १०० षटकार ठोकले. गिलख्रिस्टने खेळलेल्या ९६ कसोटी सामन्यांच्या १३७ डावांमध्ये ४७.६१ च्या सरासरीने ५५७० धावा केल्या. यात १ दुहेरी शतक, १७ शतके आणि २६ अर्धशतके असा समावेश आहे.
१. ब्रॅंडन मॅक्युलम (Brandon McCullum) – १०७ षटकार
मॅक्युलम, न्यूझीलंडचा एक स्फोटक फलंदाज आहे जो जगभरातील सर्वाधिक पसंतीच्या खेळाडूंच्या यादीत आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ब्रँडन मॅक्युलम कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणारा न्यूझीलंडचा एकमेव फलंदाज आहे.
मॅक्युलमने १०१ कसोटी सामन्यांच्या १७६ डावात ३८.६४ च्या सरासरीने एकूण ६४५३ धावा केल्या. ज्यामध्ये त्याने ७७६ चौकार आणि १०७ षटकार लगावले. तसेच, या स्वरूपात १२ शतके आणि ३१ अर्धशतकांची नोंद आहे. कसोटीत १०० किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मॅक्युलम आणि गिलख्रिस्ट यांनाच मारता आले आहेत.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये एकही षटकार मारता न आलेले 3 खेळाडू
अशी ४ कारणं, ज्यामुळे राजस्थान आहे आयपीएलचा सर्वात प्रबळ दावेदार
एकही आयपीएल आरसीबी जिंकली नाही, पण आरसीबीचे असे ३ विक्रम मात्र मुंबईलाही जमले नाहीत
महत्त्वाच्या बातम्या –
आयसीसी क्रमवारीत ख्रिस वोक्सची मोठी झेप; आर अश्विनला धोका
१३ वर्षांपुर्वी अनिल कुंबळेने कसोटीत केला होता अजब कारनामा
पाकिस्तान संघासाठी ब्रिटनमधील फॅन चक्क स्टेडियमबाहेर वाजवत होता ‘सेक्सोफोन’