यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) हायब्रिड मॉडेल अंतर्गत आयोजित केली जाणार आहे आणि या मेगा स्पर्धेचा पहिला सामना (19 फेब्रुवारी) रोजी पाकिस्तान-न्यूझीलंड संघात खेळला जाईल. या स्पर्धेसाठी भारताने आपला संघ जाहीर झाला आहे. या 15 सदस्यीय संघात अनेक बलाढ्य खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
पण भारतीय संघातून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) वगळण्यात आले आहे. त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात स्थान मिळालेले नाही. चला तर मग जाणून घेऊया की, मोहम्मद सिराजला कोणत्या 3 कारणांमुळे संघातून वगळण्यात आले आहे.
1) दबावाखाली गोलंदाजी करणे कठीण- उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) दबावाच्या परिस्थितीत गोलंदाजी करणे खूप कठीण असते. जेव्हा तुमचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज महत्त्वाच्या सामन्यात धावा देतो तेव्हा संघाला पराभवापासून काहीही वाचवू शकत नाही. सिराजने आतापर्यंत वनडे सामन्यांमध्ये फार कमी वेळा आपल्या गोलंदाजीद्वारे संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
2) फक्त नवीन चेंडूने विकेट घेण्यात माहिर- मोहम्मद सिराजला वनडे क्रिकेट खेळायला सुरूवात करून बराच काळ झाला आहे, पण तो फक्त नवीन चेंडूने विकेट घेण्यात पटाईत आहे. सिराज मधल्या आणि शेवटच्या षटकांमध्ये विकेट घेण्यासाठी संघर्ष करताना दिसतो. तो धावा थांबवण्यातही अपयशी ठरतो. त्याचे परिणाम अनेक वेळा पराभव पत्करून भोगावे लागले आहेत.
3) बऱ्याच काळापासून गोलंदाजीमध्ये धार नाही- मोहम्मद सिराज हा एक प्रतिभावान वेगवान गोलंदाज आहे. यात शंका नाही. पण गेल्या बऱ्याच काळापासून त्याच्या गोलंदाजीत कोणतीही धार नव्हती. मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत तो जसप्रीत बुमराहला पाठिंबा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरत होता. यामुळेच वेगवान गोलंदाजीचा संपूर्ण भार बुमराहच्या खांद्यावर पडला.
Rohit Sharma said – “Mohammad Siraj is not effective and his effectiveness come down when the ball gets older”. pic.twitter.com/4YIX9m075C
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 18, 2025
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआयच्या नवीन नियमांवर कर्णधार रोहित शर्माने उठवले प्रश्न..! म्हणाला…
मोहम्मद सिराजला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात स्थान का मिळालं नाही? रोहित म्हणाला…
752 ची सरासरी, तरीही दुर्लक्ष! करुण नायरच्या हाती पुन्हा एकदा निराशा