---Advertisement---

अनुभवींच्या खराब फॉर्मवर ‘या’ ५ खेळाडूंची लय टाकणार पडदा! दक्षिण आफ्रिकेत घालणार धुमाकूळ

Shreyas-Iyer-Hanuma-Vihari
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यातील ३ सामन्यांची कसोटी मालिका (3 Matches Test Series) सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. २६ डिसेंबरपासून सेंच्यूरियन येथे उभय संघातील पहिल्या कसोटी सामन्याने कसोटी मालिकेचा श्रीगणेशा होणार आहे. या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात ७ खेळाडू असे आहेत, जे पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत क्रिकेट खेळतील.

त्या ७ पैकी ५ खेळाडू असे आहेत, ज्यांनी यापूर्वीच्या कसोटी मालिकेत स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच खेळताना हे लयीत असलेले खेळाडू आपला ठसा उमटवू शकतात आणि संघाला ऐतिहासिक असा विजयही मिळवून देऊ शकतात.

भारतासाठी दक्षिण आफ्रिकेत हुकुमी एक्के ठरू शकतात ‘हे’ ५ खेळाडू

श्रेयस अय्यर – Shreyas Iyer
नुकत्याच न्यूझीलंडविरुद्धच्या मायेदशातील कसोटी मालिकेतून श्रेयसने या स्वरुपात पदार्पण केले होते. परंतु पदार्पणातच त्याची बॅट तळपली आणि त्याने कानपूरमधील पहिल्याच सामन्यात त्याने १५७ चेंडूंचा सामना करताना खणखणीत शतक झळकावले होते. यासह तो पदार्पणात शतक ठोकणारा भारताचा १६ वा आणि जहातील ११२ वा खेळाडू बनला होता. त्यामुळे अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा असे मधल्या फळीतील फलंदाज खराब फॉर्ममध्ये असताना श्रेयसकडून संघाला अपेक्षा असतील.

मयंक अगरवाल – Mayank Agarwal
स्वदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१९-२० मधील कसोटी मालिकेत कमालीची फलंदाजी करणारा मयंक अगरवालही या यादीत आहे. दक्षिण आफ्रिकेतील मैदानांवर ही त्याची पहिलीच कसोटी मालिका असेल. भारतात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत ३ सामने खेळताना त्याने ३४० धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याची फलंदाजी सरासरी ८५ इतकी राहिली होती. याखेरीज नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याची बॅट तळपती राहिली होती. त्याने या मालिकेतील मुंबई कसोटीत १५० धावा चोपल्या होत्या. त्यामुळे सलामीवीर रोहित शर्माच्या अनुपस्थित त्याच्याकडून संघाला अपेक्षा असतील.

मोहम्मद सिराज – Mohammad Siraj
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या मैदानांवर आपल्या घातक वेगवान गोलंदाजीने फलंदाजांना अडचणीत आणणारा गोलंदाज मोहम्मद सिराज, दक्षिण आफ्रिकेत आपली पहिलीच कसोटी मालिका खेळणार आहे. आतापर्यंत १० कसोटी सामन्यांमध्ये ३३ विकेट्स घेणारा सिराज मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहसोबत मिळून दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजी फळीला लवकरात लवकर तंबूत धाडू शकतो. त्यातही येथील मैदाने वेगवान गोलंदाजीस पोषक असल्याने तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो.

शार्दुल ठाकूर – Shardul Thakur
भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा दुखापतीमुळे या दौऱ्यातून बाहेर आहे. अशात शार्दुल ठाकूर भारतीय संघासाठी खूप महत्वपूर्ण खेळाडू सिद्ध होऊ शकतो. त्याचाही हा दक्षिण आफ्रिकेच्या मैदानांवर पहिलावहिलाच कसोटी सामना असेल. त्याने आतापर्यंत भारतीय संघाकडून ४ कसोटी सामने खेळताना १४ विकेट्स आणि १९० धावांची कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या देशांमध्ये त्याची बॅट बोलली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचही भारताला त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील.

रिषभ पंत – Rishabh Pant
आपल्या शानदार फलंदाजीने भारताला दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक विजय मिळवून देणारा रिषभ पंतही या यादीत आहे. त्याचीही ही दक्षिण आफ्रिकेतील पहिलीच कसोटी मालिका असेल. त्यातही वेगवान खेळपट्टींवर पंत खूप खतरनाक सिद्ध होतो. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील मैदानांवर तो जबरदस्त फटकेबाजी करताना दिसू शतचो.

या ५ खेळाडूंव्यतिरिक्त जयंत यादव आणि हनुमा विहारी यांचीही ही दक्षिण आफ्रिकेतील पहिलीच कसोटी मालिका असेल.

महत्वाच्या बातम्या-

युपीला पछाडत पंजाब ठरला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचा विजेता

द. आफ्रिकेच्या ताफ्यात पसरलीय ‘या’ भारतीय खेळाडूची भीती, कर्णधारालाही आठवण आहे ३ वर्षांपूर्वीची जखम!

कांगारू करणार इंग्लंडवर आणखी एक वार! ‘या’ तेजतर्रार गोलंदाजाला मिळाली तिसऱ्या कसोटीसाठी संधी 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---