येत्या २६ डिसेंबर पासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील दिग्गज फलंदाज आणि नवनिर्वाचित उपकर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या मासपेशी खेचल्या गेल्यामुळे तो संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या ऐवजी भारत अ संघाचा कर्णधार प्रियांक पांचाल याला संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान, रोहित शर्मानंतर पुढील उपकर्णधार कोण? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. चला तर पाहूया कोण आहेत, ते शिलेदार जे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत उपकर्णधाराची भूमिका पार पाडू शकतात.
१) केएल राहुल :
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाचा उपकर्णधार कोण असेल याबाबत कुठलीही घोषणा करण्यात आली नाहीये. परंतु, या यादीत केएल राहुल सर्वात पुढे आहे. केएल राहील टी२० संघाचा उपकर्णधार आहे. तसेच आयपीएल स्पर्धेत त्याने पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व केले आहे. केएल राहूलकडे चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे तो उपकर्णधाराची भूमिका पार पाडू शकतो.
२) रिषभ पंत :
आयपीएल २०२१ स्पर्धेत रिषभ पंतला दिल्ली कॅपिटल्स संघाची जबाबदारी देण्यात आली होती. तो फलंदाज म्हणून सरस आहे, परंतु यावेळी त्याचे नेतृत्वाचे गुण देखील पाहायला मिळाले होते. त्याच्याकडे भारतीय संघाचा भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. ज्यामुळे त्याला ही जबाबदारी दिली जाऊ शकते.
३) अजिंक्य रहाणे :
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेला उपकर्णधारपद दिले जाऊ शकते. तो फलंदाजीमध्ये फ्लॉप ठरला असला, तरी देखील त्याने नेतृत्वाच्या बाबतीत स्वतःला सिद्ध केलं आहे. न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. हा सामना अनिर्णीत राहिला होता. आता रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला पुन्हा एकदा उप कर्णधारपद दिले जाऊ शकते.
४) आर अश्विन:
आर अश्विन हा भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. तो क्रिकेटमधील एक बुद्धिमान खेळाडू आहे. तसेच त्याला पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव देखील आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्याला ही जबाबदारी दिली जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या :
मिशन वर्ल्डकप! श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जयवर्धनेवर सोपवली मोठी जबाबदारी
चिंतेचा डोंगर डोक्यावर घेऊन साहा खेळला न्यूझीलंडविरुद्धची मालिका; वाचा काय घडलेले
भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाची आपल्याच संघसहकाऱ्यांना चेतावणी; म्हणाला…