---Advertisement---

‘या’ क्रिकेटपटूंनी युवा वयातच लीलया पेलली कर्णधारपदाची जबाबदारी, एका भारतीयाचा समावेश

On: मंगळवार, जून 1, 2021 12:35 AM
---Advertisement---

क्रिकेटला सभ्य लोकांचा खेळ म्हणून ओळखले जाते. या खेळात संघाची कामगिरी जरी संपूर्ण ११ खेळाडूंच्या प्रदर्शनावर अवलंबून असली तरीही कर्णधारपदाला अनन्यसाधारण महत्व आहे. कर्णधार प्रत्यक्षात मैदानावर विविध डावपेच आखून, खेळाडूंचा योग्य वापर करून संघ समतोल ठेवण्याचे काम करत असतो. त्यामुळे कर्णधारपद म्हणजे डोक्यावर काटेरी मुकुट असल्यासारखेच असते. क्रिकेट इतिहासात अनेक यशस्वी कर्णधार होऊन गेले. तसेच असे काही खेळाडू झाले, ज्यांच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी अतिशय कमी वयात पडली.

तर आपण या लेखात असे १० खेळाडू बघणार आहोत, ज्यांना अतिशय कमी वयात कर्णधारपद भूषविण्याची संधी मिळाली.

१. राशीद खान-
अफगाणिस्तान संघाचा स्टार फिरकी गोलंदाज राशीद खानच्या नावावर सर्वात युवा कसोटी कर्णधार बनण्याचा विक्रम आहे. राशीदला वयाच्या २० वर्षे ३५० दिवशी संघ नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. सप्टेंबर २०१९ मध्ये बांगलादेश विरुद्ध त्याला कर्णधारपद देण्यात आले होते.

२. ततेंदा तैबु-
झिम्बाब्वे संघाचा दिग्गज खेळाडू ततेंदा तैबु वयाच्या २० वर्षे आणि ३५८ व्या दिवशी कर्णधार बनला. त्याला ६ मे २००४ साली श्रीलंकेविरुद्ध हरारेमध्ये नेतृत्व सोपवले गेले होते.

३. नवाब पतौडी-
माजी भारतीय दिग्गज खेळाडू मन्सूर अली खान पतौडी यांना जेव्हा कर्णधारपद सोपवले गेले होते; तेव्हा त्यांचे वय २१ वर्ष आणि ७७ दिवस होते. त्यांनी १९६२ साली वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी संघाच्या कर्णधाराची जबाबदारी पार पाडली होती.

४. वकार युनूस-
पाकिस्तानचा खतरनाक गोलंदाज ‘स्विंग किंग’ वकार युनूसला २२ वर्ष आणि १५ व्या दिवशी झिम्बाब्वे विरुद्ध कर्णधारपद देण्यात आले होते. तो सर्वात युवा वयात कसोटी क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्त्व करणारा पाकिस्तानचा पहिला खेळाडू आहे.

५. ग्रॅमी स्मिथ-
दक्षिण आफ्रिकाचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ जेव्हा कर्णधार झाला होता, तेव्हा त्याचे वय २२ वर्षे ८२ दिवस होते. बांगलादेशविरुद्ध २००३ मध्ये त्याच्यावर ही जबाबदारी सोपवली गेली होती.

६. शकीब अल हसन-
बांगलादेश संघाचा सार्वकालीन महान अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन वयाच्या २२ वर्ष आणि ११५ दिवशीच कर्णधार झाला होता. त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध १७ जुलै २००९ साली पहिल्यांदा नेतृत्व केले होते.

७. इयान क्रेग-
ऑस्ट्रेलिया संघाचे माजी कर्णधार इयान क्रेग २२ वर्षे आणि १९४ दिवसाचा असताना पहिल्यांदा कर्णधार झाले होते. त्यांनी २३ डिसेंबर १९५७ रोजी जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध नेतृत्व केले.

८. जावेद मियाँदाद-
पाकिस्तानी दिग्गज जावेद मियाँदादला २२ वर्ष आणि २६० व्या दिवशी कसोटी संघाचे कर्णधारपद बहाल करण्यात आले होते. १९८० मध्ये कराची येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने पहिल्यांदा नेतृत्त्वाचा भार सांभाळला होता.

९. मुरे बिस्सेट-
दक्षिण आफ्रिकेच्या मरे बिस्सेट या खेळाडूला वयाच्या २२ वर्षे ३०६ व्या दिवशी नेतृत्वाची संधी मिळाली होती. १९८९ मध्ये दक्षिण आफिक्रा विरुद्ध इंग्लंड सामन्यात त्याने पहिल्यांदा नेतृत्त्व केले होते.

१०. मोहम्मद अश्रफुल-
माजी बांगलादेशी दिग्गज मोहम्मद अश्रफुल वयाच्या २२ वर्षे ३५३ व्या दिवशी कर्णधार झाले होते. २००७ मध्ये श्रीलंकाविरुद्ध त्यांनी पहिल्या कसोटी बांगलादेश संघाचे नेतृत्त्व केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

अशी ३ कारणे, ज्यामुळे युएईत आयपीएल खेळवण्याचा निर्णय ठरू शकतो अयशस्वी

कसोटी चॅम्पियनशीप फायनल: टीम इंडियाचे ‘असे’ ३ निर्णय, ज्यामुळे उंचावतील तुमच्याही भुवया

खेळाडूंची सुरक्षा ते टी२० विश्वचषकाची तयारी; ‘या’ कारणांमुळे युएईत आयपीएल घेण्याचा निर्णय योग्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---