युएईमध्ये आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेचा 15वा हंगाम सुरू आहे. भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध खेळला. हा सामना भारताने 5 विकेट्सने जिंकला. यामध्ये विराट कोहलीने मोठ्या काळानंतर चांगली खेळी केली. त्याने 35 धावा केल्या. दुसरीकडे भारताची वरची फळी धावा काढण्यात अपयशी ठरत आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. राहुल तर पाकिस्तान विरुद्ध वर्षातील पहिलाच टी20 सामना खेळताना शून्यावर बाद झाला. यामुळे त्याचे संघातील स्थानाबरोबरच उपकर्णधार पदही धोक्यात आले आहे.
केएल राहुल (KL Rahul) भारतीय संघाचा उपकर्णधार आणि सलामीचा फलंदाज पाकिस्तान विरुद्ध पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तर हाँगकाँग विरुद्ध दुसऱ्या सामन्यात खेळताना 39 चेंडूत 36 धावा केल्या. तरीही त्याची ही खेळी तितकी प्रभावी नव्हती. त्याने अनेकवेळा भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. मात्र तो दुखापतीमुळे नेहमी संघाच्या आतबाहेर होत असतो. त्याने भारतासाठी चांगली कामगिरी केली नसली तरी त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) लखनऊ सुपरजाइंट्सकडून उत्कृष्ठ खेळ केला आहे. यामुळेच त्याला रोहितनंतर संघाचा कर्णधाराच्या रूपात पाहिले जाऊ लागले.
सध्या राहुल ज्याप्रकारची कामगिरी करत आहे, त्यावरून उपकर्णधारासाठी बाकी खेळाडू पुढे येण्याची शक्यता आहे. अशातच यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी20 विश्वचषक खेळला जाणार आहे. यामुळे राहुलने त्याच्या कामगिरीत प्रगती नाही केली तर भारतीय संघ व्यवस्थापक त्याच्या उपकर्णधाराबाबत विचार करतील. त्याच्या जागी उपकर्णधार म्हणून भारतीय संघामध्ये दोन पर्याय उपलब्ध आहेत.
हार्दिक पंड्या
दुखापतीनंतर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना संघाला विजेतेपद मिळवून दिले. भारताच्या या स्टार अष्टपैलू खेळाडूने फलंदाजीच नाहीतर गोलंदाजीतही पूर्ण चार षटके टाकले आहेत. तो त्याच्या सुरूवातीच्या काळात परतला आहे.
हार्दिकने यावर्षी भारतासाठी 14 टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 34.88च्या सरासरीने 314 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने फिनिशरची भुमिका पार पाडत गोलंदाजी करताना 11 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची ही कामगिरी पाहून तो उपकर्णधारासाठी योग्य पर्याय आहे.
रविंद्र जडेजा
हार्दिकच्या व्यतिरिक्त भारताकडे आणखी एक अष्टपैलू खेळाडू आहे जो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये धमाकेदार कामगिरी करत आहे. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने फलंदाजी नाही करत गोलंदाजी करताना भारतीय संघाच्या विजयात महत्वाची भुमिका पार पाडली आहे. सध्या तो गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर पडला आहे. त्याने संघात लवकर पुनरागमन करावे अशीच संघाची आशा आहे.
जडेजाने यावर्षी भारतासाठी 9 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 50.25च्या सरासरीने 201 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना 5 विकेट्स घेतल्या. त्याची ही कामगिरीच उपकर्णधार पदाच्या दावेदारीसाठी पूरक आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो थकलाय आणि घाबरलाय..’, भारतीय कर्णधार रोहितविषयी पाकिस्तानी क्रिकेटरचे कडवट भाष्य
बांगलादेशला सळो की पळो करणाऱ्या कुसल मेंडिसचा खास ‘ऍक्शन प्लॅन’! स्वत: केलायं खुलासा
नशीब बलवत्तर! श्रीलंकेच्या मेंडिसला 5 वेळा जीवनदान, मग थेट अर्धशतक करत ठरला मॅच विनर