भारतीय संघाचा मध्यक्रमातील फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सूर्यकुमारने नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषक 2022 मध्ये संघासाठी चांगले प्रदर्शन केले असून न्यूझीलंड दौऱ्यात देखील त्याचा चांगला फॉर्म कायम आहे. दुसरीकडे भारताचा दिग्गज अष्टैपूल रविंद्र जडेजा सध्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. अशात बांगलादेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी सुर्यकुमारला जडेजाच्या जागी संघात संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
भारताचा स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) गुडघ्याच्या दुखापतीमुळे आयसीसीस टी-20 विश्वचषक 2022 मधून माघार घेतली होती. त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यात देखील जडेजा या दुखापतीमुळेच सहभागी होऊ शकला नाही. डिसेंबर महिन्यात भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात निवडकर्त्यांनी रविंद्र जडेजाला सामील केले होते. पण जडेजा या दौऱ्यापूर्वी दुखापतीतून पूर्णपणे सावरेल अशी शक्यता खूपच कमी आहे. अशात जडेजाच्या जागी सूर्यकुमार भारताच्या कसोटी जर्सीमध्ये दिसू शकतो. बांगालादेशविरुद्ध भारताला दोन सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. सूर्यकुमार या दौऱ्यात कसोटी पदार्पण करण्यासाठी तयार असल्याचे, सध्या तरी दिसत आहे.
सूर्यकुमार यादवने आतापर्यंत भारतीय संघासाठी 13 एकदिवसीय सामने, तर 42 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. सूर्यकुमार यादवने त्याच्या वादळी खेळीच्या जोरावर सर्वांना प्रभावित केले आहे. याच पार्श्वभूमीवर कसोटी संघाची दारे लवकरच त्याच्यासाठी उघडले जाऊ शकतात. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजांचा समावेश असल्यामुळे संघाला फिरकी गोलंदाजांची कमी जाणवणार नाहीये. असात जडेजाच्या जागी संघात एक फलंदाजाचे आगमन नक्कीच होऊ शकते.
दरम्यान संघाच्या या दौऱ्याचा एकंदरीत विचार केला, तर कसोटी मालिकेव्यतिरिक्त उभय संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील महत्वाची असेल. एकदिवसीय मालिकेची सुरुवात 4 डिसेंबर रोजी सोहणार असून 10 डिसेंबरला या मालिकेचा शेवटचा सामना पार पडेल. त्यानंतर 14 ते 18 डिसेंबरदरम्यान पहिला कसोटी सामना खेळला जाईल. कसोटी मालिकेतील दुसरा सामना 22 ते 26 डिसेंबर रोजी खेळला जाईल.
बांगलादेश दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
बांगलादेश दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जस्टीन लॅंगर यांचा पॅट कमिन्सवर हल्लाबोल; म्हणाले, ‘तो भित्रा असून माझ्यासमोर वेगळा वागत होता!’
वेंकटेश अय्यरचा खुलासा; म्हणाला, ‘त्यामुळे रोहित शर्मा गोलंदाजीची संधी देत नाही’