कोविड-१९ महामारीमुळे इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. तत्पुर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून तो दिल्लीत क्वारंटाईनमध्ये होता. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या कोरोना चाचणीचा अहवालही पॉझिटिव्ह आढळला होता.
विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याची निवड करण्यात आली असल्याने भारतीय संघाची चिंता वाढली होती. परंतु आता तो कोरोना निगेटिव्ह आल्याने भारतीय संघाच्या काळजीत घट झाली आहे.
आयपीएल २०२१ चा हंगाम स्थगित होण्यापुर्वी साहा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. दिल्लीत १० दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर साहाची दुसरी कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल १४ मे रोजी आला होता. त्यावेळी तो पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यामुळे त्याला पुढे काही दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागले. अखेर तिसऱ्या चाचणीत त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
साहाच्या तब्येतीची माहिती ठेवणाऱ्या एका सूत्राने डेली टेलिग्राफला सांगितले की, “साहा आता पूर्णपणे कोरोनातून बरा झाला आहे. त्याच्या शरीरात कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या ऍन्टिबॉडिज तयार झाल्या आहेत. त्यामुळे त्याच्यापासून दुसऱ्या कोणाला कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाही.”
कोरोनामुक्त झाल्यामुळे इतर खेळाडूंप्रमाणे साहादेखील या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघासोबत लवकरच सहभागी होईल. १९ मे रोजी मुंबईत इंग्लंड दौऱ्यावर जाणारे भारतीय खेळाडू एकत्र जमणार आहेत. तिथे सर्वांना काही दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करायचा आहे. त्यानंतर २ जून रोजी चार्टर्ड विमानाने भारतीय संघ इंग्लंडला रवाना होईल.
येत्या १८ ते २२ जूनदरम्यान साउथम्पटन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना होणार आहे. त्यानंतर ऑगस्ट-नोव्हेंबरमध्ये इंग्लंड विरुद्ध भारत संघ भिडणार आहेत. त्यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नोव्हेंबर महिन्यात टीम इंडिया करणार ‘या’ देशाचा दौरा, पाहा कसे असेल वेळापत्रक!
टीम इंडियासाठी अक्षरश: जीवाचं रान केलेल्या ‘या’ ३ खेळाडूंना कधीही मिळाली नाही कर्णधारपदाची संधी
‘या’ खेळाडूने बाॅर्डर पलिकडे भारताला मिळवून दिला होता पहिला विजय