टी20 विश्वचषकाच्या आठव्या पर्वात मंगळवारी (1 नोव्हेंबर) इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात सुपर 12चा सामना खेळला गेला. हा सामना इंग्लंडने 20 धावांनी जिंकत उपांत्य फेरीच्या आशा कायम राखल्या आहेत. तसेच आयसीसीच्या या स्पर्धेत आजच्या सामन्यात असे काही पाहायला मिळाले ज्याची कोणीही कल्पना केली नसेल. सध्याच्या काळात स्पिरीट ऑफ क्रिकेटची चर्चा केली तर यादीमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन हा अव्वल स्थानावर आहे, मात्र त्याने इंग्लंडच्या विरुद्ध घेतलेल्या एका झेलने वाद निर्माण झाला.
झाले असे की, इंग्लंडची फलंदाजी सुरू होती. कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) हा 8 धावा करत खेळपट्टीवर उपस्थित होता, मात्र त्याने एक शॉट खेळला ज्याचा एकदम अचूक झेल केन विलियमसन (Kane Williamson) याने घेतला. हाच तो झेल वादाचे कारण ठरला, कारण विलियमसनने झेल घेतला याची अपील मुद्दाम केली का नाही याबाबत नानाविध चर्चा सुरू झाल्या.
इंग्लंडच्या डावातील सहावे षटक सुरू होते आणि बटलर 8 चेंडूवर 8 धावा करत खेळपट्टीवर हा. मिचेल सॅंटनर गोलंदाजी करत होता, तेव्हा त्याने षटकातील तिसरा चेंडू टाकला ज्याच्यावर बटलरने हवेत शॉट खेळला. बटलरने हा शॉट एक्स्ट्रा कव्हरच्यावर खेळला. ज्याचा झेल घेण्यासाठी विलियमसनने हवेत सूर मारत चेंडू पकडला.
विलियमसनचा हा चालू स्पर्धेतील सर्वात उत्तम झेल ठरला असता मात्र जेव्हा त्या कॅचचा रिप्ले पाहिला गेला तेव्हा चेंडू जमिनीला लागल्याचे पंचांच्या लक्षात आले. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी बटलरला नाबाद ठरवले, दुसरीकडे विलियमसनने झेलची अपील केल्याने बटलरची माफी मागितली. याचा व्हिडिओ आयसीसीनेही शेयर केला, जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/CkaWsDLpNkl/?utm_source=ig_web_copy_link
या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना बटलरच्या 73 आणि ऍलेक्स हेल्सच्या 52 धावांच्या खेळीमुळे 20 षटकात 6 विकेट्स गमावत 179 धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स (62) आणि विलियमसन (40) यांनी सर्वाधिक धावा केल्या. मात्र, 20 षटकात त्यांनी 6 विकेट्स गमावत 159 धावा केल्या आणि सामना हरला. या पराभवाचा त्यांच्या गुणतालिकेतील स्थानावर काही परिणाण झाला नाही. ते अव्वल स्थानावर कायम आहेत, मात्र यजमान संघाच्या उपांत्य फेरीच्या चिंतेत वाढ झाली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बटलर शो’नंतर गोलंदाजांच्या जोरावर इंग्लंडचा शानदार विजय; न्यूझीलंडच्या खात्यात पहिली हार
यष्टीरक्षकाच्या भूमिकेत कुणालाच जमलं नाही ते बटलरनं केलं! 100व्या टी-20 सामन्यात लावली विक्रमांची रास