वेस्ट झोनचा सलामीवीर यशस्वी जायसवाल (Yashasvi Jaiswal) याचे दुलीप ट्रॉफीचे पहिलेच पर्व आहे. त्याने 235 चेंडूतच द्विशतक झळकावले आहे. रणजी ट्रॉफीमध्ये सुरू झालेला त्याच्या धावांचा रथ थांबलेलाच नाही. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबई आणि मध्य प्रदेश समोरासमोर आले. हा सामना जरी मध्य प्रदेशने जिंकला तरी अंतिम सामन्यात यशस्वीने उत्तम कामगिरी केली. त्याने रणजीच्या उपांत्यपूर्व आणि दोन्ही उपांत्य सामन्यात शतक केले होते. तसेच अंतिम सामन्यातही अर्धशतक केले होते.
रणजी ट्रॉफीची कामगिरी सुरूच ठेवत यशस्वीने दुलीप ट्रॉफीमध्येही धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने दुलीप ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यातही द्विशतक केले होते. त्याच्या प्रथम श्रेणीची आकडेवारी थक्क करणारी आहे. त्याने 7 सामन्यांतील 13 डावांमध्ये खेळताना 950 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सरासरी 75च्या आसपास आहे. लिस्ट ए च्या 26 सामन्यांमध्ये 26 डावांमध्ये 48.47च्या सरासरीने 1115 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतके आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.
WHAT. A. KNOCK! 👌 👌
2️⃣0⃣0⃣ for @ybj_19! 🙌 🙌
This has been an outstanding batting display by the youngster! 👏 👏#DuleepTrophy | #Final | #WZvSZ | @mastercardindia
Follow the match ▶️ https://t.co/NAjd4WxZRR pic.twitter.com/36orpdlRj5
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 23, 2022
या स्पर्धेत वेस्ट झोन अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. त्यांनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा पहिला डाव 270 धावांवरच संपुष्टात आला. हेथ पटेल याने 98 धावा केल्या. तर साऊथ झोनने 327 धावा केल्या. यावेळी बाबा इंद्रजीत याने 118 धावा केल्या तर वेस्ट झोनच्या जयदेव उनाटकटने 4 विकेट्स घेतल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असता यशस्वीने नाबाद 244 चेंडूत 23 चौकार आणि 3 षटकार ठोकत 209 धावा केल्या आहेत. तर त्याच्यासोबत सरफराज खान 30 धावा करत खेळपट्टीवर उपस्थित आहेत. तर रहाणे 15 आणि श्रेयस अय्यर 71 धावा करत बाद झाले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्ली-मुंबई जडेजाला आपल्या संघात घेण्यास उत्सुक; सीएसकेने दिले हे उत्तर
पंत की कार्तिक? दिग्गज ‘विकेटकीपर’ने सांगितले टीम इंडियासाठी कोण महत्वाचे
पाकिस्तानच्या विजयानंतर आफ्रिदीचे ट्वीट व्हायरल; म्हणाला, ‘सेल्फिश आहेत बाबर-रिझवान…’