---Advertisement---

‘या’ तीन गोष्टी बदलू शकतात कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा निकाल

On: गुरूवार, जून 17, 2021 8:35 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंडचा संघ पहिल्यावाहिल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध दोन हात करतील. हा सामना शुक्रवार (18 जून) पासून साउथटम्पनच्या एजेस बाऊल मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात क्रिकेटविश्वातील दर्जेदार खेळाडू खेळतांना दिसतील. या लेखात आपण अशा तीन गोष्टी पाहुया, ज्यामुळे अंतिम सामन्याचे चित्र पालटू शकते.

कोहली आणि विलीयम्सनची कामगिरी
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलीयम्सन या दोघांची गणना वर्तमान क्रिकेटमधील महान फलंदाज म्हणून केली जाते. दोन्ही कर्णधारांनी कसोटी क्रिकेटमध्ये 7000 पेक्षा जास्त धावांचा टप्पा गाठलेला आहे. याव्यतिरिक्त दोघांनीही 50पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या मैदानावर विराट कोहली उजवा ठरतो. साल 2018 साली झालेल्या कसोटी मालिकेत त्याने दोन शतक झळकावली होती. दोघांच्या नेतृत्वात देखील फरक असून विलीयम्सन मैदानावर शांत दिसतो तर विराट आक्रमक अंदाजात वावरत असतो.

दोन्ही संघ आपल्या कर्णधाराशिवाय विजयी 
या दोन्ही संघाचे वैशिष्ट म्हणजे या दोन्ही संघांनी आपल्या नियमित कर्णधाराशिवाय सामना जिंकण्याची किमया केली आहे. याच वर्षी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीच्या अनुपस्थितीत विजय मिळवला होता. तर नुकताच न्यूझीलंडने देखील केन विलीयम्सनशिवाय इंग्लंडवर मालिका विजय मिळवला होता.

गोलंदाजी आक्रमण
दोन्ही संघाजवळ जबरदस्त गोलंदाजी आक्रमण आहे. परंतु या सामन्यात न्यूझीलंडच पारडं जड आहे कारण त्यांनी नुकतीच इंग्लंडविरुद्धची मालिका 1-0 ने खिशात घातली. याचा फायदा न्यूझीलंडला अंतिम सामन्यासाठी होऊ शकतो. भारतीय संघाकडून न्यूझीलंडविरुद्ध खेळण्याऱ्या सर्व गोलंदाजांचा समावेश आयसीसीच्या टॉप20 गोलंदाजांमध्ये आहे. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारा आर अश्विन जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. तसेच जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा देखील अव्वल २० गोलंदाजांमध्ये आहेत

त्याचवेळी न्यूझीलंडकडून टीम साउदी आणि ट्रेंट बोल्ट हे गोलंदाजी आक्रमण सांभाळतील. डावखुरा वेगवान गोलंदाज बोल्ट वैविध्यपूर्ण गोलंदाजी करीत असतो. त्यात दोन्ही गोलंदाजांचा स्विंग देखील या सामन्यात उपयुक्त अस्त्र ठरेल. इंग्लंडविरुद्ध 6 बळी घेणाऱ्या मॅट हेन्रीला अंतिम सामन्यात मिळण्याची शक्यता कमी आहे, कारण टीम साउदी आणि कायले जेमिसन यांनी संघात पुरागमन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

धोनी माझ्यासाठी देवासमान, त्याच्याशी तुलना करू नका

आयसीसीने केले विराटच्या एक्सप्रेशन्सचे फोटो शेअर; नेटकऱ्यांनी ट्विटरवर अशाप्रकारे उडवली थट्टा

सलग दोन विजयांसह युरो कप २०२० च्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला इटली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---