---Advertisement---

भारत-न्यूझीलंडच्या या ५ खेळाडूंनी मिळून टी२० क्रिकेटमध्ये घडवला इतिहास

On: शुक्रवार, जानेवारी 24, 2020 6:20 PM
---Advertisement---

ऑकलँड। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज(24 जानेवारी) पहिला टी20 सामना पार पडला. इडन पार्क येथे झालेल्या या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात एक अनोखी गोष्टही पहायला मिळाली.

आज भारत आणि न्यूझीलंडच्या मिळून 5 फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट इतिहासात असे पहिल्यांदाच झाले की एका सामन्यात 5 क्रिकेटपटूंनी 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली. याआधी असे कधीही झाले नव्हते.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडकडून कॉलिन मुन्रो(59), केन विलियम्सन(51) आणि रॉस टेलर(54*) यांनी अर्धशतके करताना न्यूझीलंडला 5 बाद 203 धावसंख्या उभारुन देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.

तर त्यानंतर 204 धावांचा पाठलाग करताना भारताकडून केएल राहुल(56) आणि श्रेयस अय्यर(58*) यांनी अर्धशतके केली. त्यांच्या अर्धशतकांच्या मदतीने भारताने 204 धावांचे आव्हान 19 षटकात पूर्ण केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---