---Advertisement---

टी20 विश्वचषकात दहशतवादी हल्ल्याची धमकी, पंतप्रधानांनी केला धक्कादायक खुलासा

On: सोमवार, मे 6, 2024 4:27 PM
t20 world cup
---Advertisement---

अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या टी20 विश्वचषकात दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली आहे. त्रिनिनाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान डॉ. कीथ रॉले यांनी याचा खुलासा केला. रॉले म्हणाले की, या धोक्यापासून निपटण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा अधिक चोख केली जाईल. या दहशतवादी हल्ल्याची धमकी कोणत्या संघटनेनं दिली, हे मात्र रॉले यांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाही.

2024 टी20 विश्वचषकाला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 20 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार सध्या वेस्ट इंडिजला हल्ल्याचा जास्त धोका आहे, कारण येथे सुपर 8, सेमीफायनल आणि फायनल सामन्याचं आयोजन केलं जाणार आहे.

रॉले यांनी खासकरून कोणत्याही संघटनेचं नाव घेण्याचं टाळलं. मात्र रिपोर्ट्सनुसार, ‘इस्लामिक स्टेट्स’नं या हल्ल्याची धमकी दिली आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, “जेव्हा कोणताही देश अशाप्रकारच्या स्पर्धांचं आयोजन करत असतो, तेव्हा राष्ट्रीय सुरक्षा गंभीरतेनं घेतली जाते. देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत.”

रॉले म्हणाले की, “9 ठिकाणी विश्वचषकाचे सामने खेळले जाणार आहेत, ज्यामध्ये 6 वेस्ट इंडिजमधील ठिकाणांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी चोख सुरक्षा ठेवली जाईल. आम्ही कोणत्याही धोक्याशी लढायला तयार आहोत. आम्ही आमच्या देशाची गुप्तचर यंत्रणा आणि अन्य सुरक्षा इजन्सींशी मिळून जनतेला या धोक्यापासून वाचवू शकतो.”

टी20 विश्वचषकाचे वेस्ट इंडिज मधील सामने अँटीगा, बार्बाडोस, गयाना, सेंट लूसिया, सेंट विंसेंट आणि ग्रेनेडा व त्रिनिनाद आणि टोबॅगो येथे खेळले जाणार आहेत. तर अमेरिकेतील सामने फ्लोरिडा, न्यूयॉर्क आणि टेक्सास येथे खेळले जातील. न्यूयॉर्कमध्ये 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धींमध्ये सामना खेळला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या – 

“जर 9व्या क्रमांकावर फलंदाजी करायची असेल तर खेळूच नको”, हरभजन सिंगचा माहीवर जोरदार हल्लाबोल

एमएस धोनीला ‘बोल्ड’ केल्यानंतर चाहत्यांचा राग अनावर! सोशल मीडियावर हर्षल पटेल द्वेषाचा बळी

कोलकाताची विजयी घौडदौड जारी, लखनऊचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---