---Advertisement---

किंगसाठी कायपण! विराटसोबत सेल्फी घेण्यासाठी एकाच वेळी मैदानात घुसले तीन चाहते; एकाने तर…

On: रविवार, मार्च 13, 2022 11:07 PM
FAN ENTERED IN GROUND
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका संघात २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना बंगळुरूच्या एम. चिन्मास्वामी स्टेडिअमवर खेळला जात आहे. हा दिवस- रात्र कसोटी सामना आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने सामन्यावरील आपली पकड मजबूत केली.‌ मात्र, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर असे काही चित्र दिसले जे अगदी दुर्मिळ असते.

मैदानात घुसले चाहते

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसातील अखेरच्या सत्रात एक अजब घटना घडली. ड्रिंक ब्रेक झाला असताना एकाच वेळी तीन चाहते मैदानात उतरले. त्यांनी थेट भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीकडे घेतली. विशेष म्हणजे त्यांनी या दरम्यान झटपट विराटसोबत सेल्फी देखील काढली. त्यानंतर एका प्रेक्षकाने तर कहरच केला. त्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांना चांगलेच पळवले. अखेर या तिन्ही प्रेक्षकांना मैदानाबाहेर घेऊन जाण्यात पोलिसांना यश आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.

यापूर्वीही घडल्या आहेत घटना

भारतीय मैदानांवर अशा घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. आता सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, माजी कर्णधार एमएस धोनी तसेच विद्यमान कर्णधार रोहित शर्मा यांच्यासाठी देखील चाहते अशाप्रकारे मैदानात प्रवेश करतात. एमएस धोनीने अनेकदा अशा प्रेक्षकांची मजा घेतल्याचे देखील पहायला मिळाले आहे.

भारतीय संघ सामन्यात आघाडीवर

बेंगलोर कसोटीत दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले आहेत. पहिला डाव २५२ धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला १०९ धावांवर गुंडाळले. त्यानंतर, भारताने दुसर्‍या डावात आक्रमक फलंदाजी करताना ३०३ धावांवर आपला डाव घोषित करत श्रीलंकेसमोर विजयासाठी ४४७ धावांचे लक्ष ठेवले. उर्वरित ९ बळी घेऊन भारताला हा सामना तिसऱ्या दिवशी जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.

महत्वाच्या बातम्या-

INDvSL: क्लीन स्वीप देण्यापासून टीम इंडिया ९ बळी दूर; दुसरा दिवस रिषभ-श्रेयसच्या नावे (mahasports.in)

बंगळुरूत घोंगावलं पंत नावाचं वादळ! मोडलाय थेट ४० वर्षांपूर्वीचा विक्रम (mahasports.in)

धक्कादायक! रोहित शर्माने मारलेल्या षटकाराने प्रेक्षकाचे नाक फ्रॅक्चर, डॉक्टर म्हणाले… (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---