इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी टी-२० क्रिकेट लीग आहे. या लीगमध्ये जगभरातील स्टार क्रिकेटपटू सहभाग घेत असतात. इतकेच नव्हे तर नेपाळ आणि अफगाणिस्तान देशातील खेळाडूंना देखील या लीगमध्ये प्राधान्य दिले जाते. परंतु पाकिस्तान संघातील खेळाडूंना आयपीएल खेळण्यास सक्त मनाई आहे.
आयपीएलच्या पहिल्या हंगामात पाकिस्तान संघातील खेळाडूंना देखील संधी देण्यात आली होती. परंतु २००८ साली मुंबईवर पाकिस्तानी आतंकवाद्यांनी केलेल्या हल्लायमुळे तेथील खेळाडूंवर आयपीएल खेळण्यास बंदी घालण्यात आली. त्यानंतर देखील असे तीन पाकिस्तानी क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी दुसऱ्या देशाचे नागरिकत्व मिळाल्यानंतर आयपीएल स्पर्धा खेळली. चला तर पाहूया कोण आहेत ते पाकिस्तानी क्रिकेटपटू?
अजहर महमूद : पाकिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू अजहर महमूद याने पाकिस्तान संघासाठी एकूण १४३ वनडे सामने आणि २१ कसोटी सामने खेळले आहेत. त्यानंतर या खेळाडूने इंग्लंडच्या दिशेने वाट धरली होती. जेव्हा पाकिस्तान संघातील खेळाडूंवर आयपीएल स्पर्धा खेळण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी या खेळाडूला इंग्लंडचे नागरिकत्व मिळाले होते. त्यामुळे या खेळाडूला आयपीएल स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली होती.
त्याने या स्पर्धेत किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकत्ता नाइट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने २३ सामन्यात २०.४२ च्या सरासरीने ३८८ धावा केल्या होत्या. यासोबतच २९ गडी देखील बाद केले होते.
इमरान ताहिर : दक्षिण आफ्रिका संघाचा फिरकी गोलंदाज इमरान ताहिर याने दक्षिण आफ्रिका संघासाठी गेल्या काही वर्षांमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. त्याचा जन्म २८ मार्च १९७९ मध्ये पाकिस्तानच्या लाहोरमध्ये झाला होता. त्याने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले होते. कौशल्य असून देखील त्याला पाकिस्तान संघात खेळण्याची माफक संधी मिळत नव्हती. त्यामुळे त्याने दक्षिण आफ्रिकेत जाऊन क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यांनतर त्याला दक्षिण आफ्रिकेचे नागरिकत्व देखील मिळाले.
तो आता आपल्या कुटुंबासह दक्षिण आफ्रिकेतच राहतो. त्याने आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत एकूण ५९ सामने खेळले आहेत. यात त्याला ८२ गडी बाद करण्यात यश आले आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
उस्मान ख्वाजा : ऑस्ट्रेलियन संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा याचा जन्म १८ डिसेंबर १९८६ रोजी पाकिस्तानस्थित इस्लामाबादमध्ये झाला होता. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियामध्ये गेला होता. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व देखील स्वीकार केले होते. त्याचा कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने, ऑस्ट्रेलिया संघासाठी ४४ कसोटी सामने, ४० वनडे सामने आणि ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
त्याने २०१६ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत रायसिंग पुणे सुपरजाइंट्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या हंगामात त्याला ६ आयपीएल सामने खेळण्याची संधी मिळाली होती. यात त्याने १२७ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या श्रीलंका दौऱ्याचा वाढणार रोमांच, ३ नव्हे ‘इतक्या’ सामन्यांची होणार टी२० मालिका!
‘वर्क इन प्रोग्रेस,’ खांद्याच्या सर्जरीनंतर अय्यर श्रीलंका दौरा गाजवण्यास सज्ज; ‘असा’ करतोय तयारी
भारतीय महिला क्रिकेटरसोबत झाला होता वाद, आता त्याच संघाचे बनलेत ‘महागुरु’; जाणून घ्या त्यांच्याविषयी