भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला बुधवारपासून (२४ फेब्रुवारी )सुरुवात होणार आहे. हा सामना दोन्हीही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणार आहे. चेन्नईमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघावर २२७ धावांनी विजय मिळवला होता. यात कर्णधार जो रुटने २१८ धावांची दुहेरी खेळी केली होती. त्यांनतर चोख प्रत्युत्तर देत भारतीय संघाने देखील इंग्लंड संघावर ३१७ धावांनी मोठा विजय मिळवला होता. यात आर अश्विनने अष्टपैलू कामगिरी करत शतक झळकावले होते आणि ९ गडी देखील बाद केले होते.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तसेच हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना आहे. भारतीय संघाने आतापर्यंत मायदेशात एकच दिवस-रात्र कसोटी सामना खेळला आहे. यात भारतीय संघाला विजय मिळाला आहे. यामुळे भारतीय संघाचे पारडे या सामन्यात जड आहे. या लेखात आपण भारतीय संघ या सामन्यात का जिंकू शकतो याची ३ कारणे पाहू.
३. भारतीय संघाने मायदेशात खेळताना गेल्या ९ वर्षात एकही कसोटी मालिका गमावली नाहीये. तसेच सलग १२ कसोटी मालिका जिंकल्या आहेत. यात त्यांनी बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांना पराभूत केले आहे. तसेच इंग्लंड संघाला मागच्या दौऱ्यावर कसोटी मालिकेत ४-० ने पराभूत केले होते. ५ सामन्यांच्या मालिकेत १ सामना ड्रॉ राहिला होता.
भारतीय संघाचा हा इतिहास पाहाता आणि मागील सामन्यातील कामगिरी पाहाता, भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी इंग्लंडला बरिच मेहनत घ्यावी लागेल. भारतीय संघाने मागील सामन्यात ३१७ धावांनी मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे सध्या भारतीय संघात आत्मविश्वास असून भारतीय खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.
२. ज्या मैदानावर ( मोटेरा) भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. त्या मैदानावर इंग्लंड संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. आतापर्यंत या मैदानात भारत आणि इंग्लंड संघात झालेल्या २ कसोटी सामन्यात १ सामना भारतीय संघाने जिंकला होता तर एक सामना ड्रॉ राहिला होता.
१. आतापर्यंत ६ आंतरराष्ट्रीय संघांनी मायदेशात दिवस-रात्र कसोटी सामने खेळले आहेत. यात भारतीय संघाव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज संघाचा समावेश आहे. अशातच वेस्ट इंडिज संघाला वगळता इतर संघांनी मायदेशात दिवस-रात्र कसोटी जिंकले देखील आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
दिवस-रात्र कसोटीआधी रिषभ पंतची मस्ती, विराट कोहलीलाही घाबरवले; पाहा व्हिडिओ
‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेलचा आणखी एक मोठा विक्रम! या भारतीय क्रिकेटरला टाकले मागे
सचिन, २०० धावांची खेळी आणि आम्ही…