आयपीएल स्पर्धेत असे फारच कमी वेळा झाले आहे, की जिथे एखादा गोलंदाज अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकतो. टी-20 या क्रिकेट प्रकारात बऱ्याचदा फलंदाजांचा दबदबा असतो. अशात गोलंदाज अतिशय काळजीपूर्वक खेळ करण्याच्या विचारात खेळ करतात. तसेच जरी फलंदाजांना दबदबा असला तरी अनेकदा गोलंदाज आपल्या शानदार गोलंदाजीने संघाला विजेतेरद मिळवून देतात.
आयपीएलच्या 13 हंगामातही अनेक गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मात्र केवळ आतापर्यंत 3 गोलंदाजांना फक्त अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकता आला आहे. कोण आहेत ते 3 गोलंदाज, ते पाहूया.
1. ट्रेंट बोल्ट – 2020
आयपीएलच्या 13 व्या हंगामात ट्रेंट बोल्टने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याच्या भेदक गोलंदाजी समोर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने अक्षरशः हत्यारे टाकून दिली. बोल्टने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 4 षटकांत 30 धावा देत 3 बळी मिळवले. संपूर्ण हंगामात त्याने 25 बळी घेतले. तसेच अंतिम सामन्यातील जबरदस्त कामगिरीमुळे त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.
2. जसप्रीत बुमराह – 2019
आयपीएल 2019 मध्ये मुंबई संघाची कामगिरी जबरदस्त झाली होती.
भारतात झालेल्या आयपीएल 2019 मध्ये मुंबईचा संघ एक मजबूत संघ बनून होता. या हंगामातील अंतिम सामना मुंबई विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा होता. मुंबईने मात्र 150 धावांचे लक्ष्य चेन्नईला दिले होते. पण मुंबईच्या मजबूत गोलंदाजी समोर मात्र एका धावेने अंतिम सामना चेन्नईने गमावला. त्या सामन्यात बुमराहला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्याने 4 षटकांत मात्र 14 धावा देत 2 गडी बाद केले होते.
3. अनिल कुंबळे – 2009
आयपीएलच्या दुसऱ्या हंगामातील अंतिम सामन्यात चांगली गोलंदाजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून पहायला मिळाली होती. या सामन्यात अनिल कुंबलेने 4 षटकांत मात्र 16 धावा देत डेक्कन चार्जर्सचे 4 गडी बाद केले होते. तो सामना पराभूत होऊनही कुंबलेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. आयपीएल स्पर्धेत हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला गोलंदाज ठरला होता. पुढे 10 वर्षे हा कारनामा कोणताही गोलंदाज करू शकला नाही. 2009 नंतर थेट 2019 मध्ये एक गोलंदाज आयपीएलच्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईच्या फलंदाजांच्या नावे अनोखा विक्रम; विराट, डिव्हिलियर्स आणि गेलच्या कामगिरीची पुनरावृत्ती
संपुर्ण यादी- आयपीएल २०२०मध्ये या खेळाडूंना मिळाले अवॉर्ड्स!
IPL 2020 : मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक दांड्या गुल करणारा संघाचा हुकमी एक्का, घेतले सर्वाधिक बळी