युएई आणि ओमानमध्ये येत्या १९ सप्टेंबरपासून इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांना प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठी सर्वच संघांनी कसून सरावाला सुरुवात केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आपले पहिलेच जेतेपद पटकवण्याच्या प्रयत्नात आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अप्रतिम कामगिरी केली होती. तर दुसऱ्या टप्प्यात हा संघ आणखी मजबूत संघ म्हणून मैदानात उतरण्याच्या प्रयत्नात आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी या संघात आणखी एका धाकड फलंदाजाला संधी देण्यात आली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघामध्ये विराट कोहली, एबी डीवीलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल सारखे आक्रमक फलंदाज आहेत, जे कुठल्याही क्षणी सामन्याचे चित्र बदलू शकतात. या फलंदाजांना आता टीम डेव्हिडची साथ मिळणार आहे. एक महिन्यापूर्वीच सिंगापूरच्या टीम डेव्हिडला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात स्थान देण्यात आले आहे.
कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतील त्याची कामगिरी पाहता त्याला आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी एक्स फॅक्टर मानले जाऊ लागले आहे.
कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतील उपांत्यफेरीच्या सामन्यात या फलंदाजाने गोलंदाजांच्या चिंतेत वाढ केली होती. त्याने अवघ्या १७ चेंडूंमध्ये ३८ धावांची खेळी केली होती. याच ताबडतोड खेळीच्या जोरावर त्याच्या संघाने २१ धावांनी सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
डेव्हिडच्या या खेळीमुळे सेंट लुसिया किंग्ज संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला. या कामगिरीनंतर आयपीएल २०२१ स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला दिलासा मिळाला असेल. ट्रीनबागो नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात डेव्हिडने १८ व्या षटकात सलग ३ षटकार मारले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट २२३.५३ चा होता. या खेळी दरम्यान त्याने १ चौकार आणि ४ षटकार मारले. यापूर्वी डेव्हिडने कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत ३४, नाबाद ४७ आणि ४३ धावांची खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झालेले ‘तीन’ शिलेदार, कोणालाही नव्हती अपेक्षा






