टी-20 विश्वचषक 2022 मध्ये बुधवारी (9 नोव्हेंबर) पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला उपांत्य सामना पार पडणार आहे. या सामन्यात पाकिस्तानच्या तुलनेत न्यूझीलंडचे पारडे जड दिसते. पण त्यांचा वेगवान गोलंदाज टिम साउदी मात्र संघाच्या चांगल्या प्रदर्शनामुळे पाकिस्तानला हलक्यात घेणार नाही. पाकिस्तानविरुद्ध खेळताना विरोधकांना हलक्यात घेऊन चालणार नाही, असे त्याने म्हटले आहे.
टिम साउदी (Tim Southee) याच्या मते न्यूझीलंड संघ पाकिस्तानला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. पाकिस्तानचा उपांत्य सामन्यापर्यंतचा प्रवास तसे पाहिले तर खूपच खडतर राहिला आहे. साउदी संघ इथपर्यंत ज्या पद्धतीने पोहोचला, त्यावर देखील बोलला. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला उपांत्य सामन्यात बुधवारी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. त्याआधी साउदी माध्यमांशी बोलत होता. यावेळी त्याने इतर काही महत्वाच्या मुद्यांवर देखील मत मांडले.
साउदी माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “जेव्हा पहिले चार संघ समोर येतात, तेव्हा प्रत्येकाकडे जिंकण्याची संधी असते. त्यांना (पाकिस्तान) याचे श्रेय मिळते कारण त्यांच्याकडे उपांत्य सामन्यात पोहोचण्याची संधी नाहीये असा विचार करत, ते इथपर्यंत आले आहेत. त्यांनी चांगले प्रदर्शन केले आणि आमच्यासाठी धोका ठरू शकतात. उपांत्य सामना रोमांचक असेल. तुम्ही ज्याविषयी विचार करत असता, तेच हे शेवटचे दोन सामने आहेत. आम्ही ज्या पद्धतीने खेळलो आहोत, ते पुढेही सुरू राहील आणि उपांत्य सामन्यात अजून एक चांगले प्रदर्शन पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. पाकिस्तान एक चांगला संघ आहे आणि त्यांच्याविरुद्ध जिंकण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम प्रदर्शन करावे लागेल.”
पाकिस्तान संघ उपांत्य सामन्याज पोहोचला असला, तरी याची अपेक्षा मात्र कुणालाच नव्हती. कारण बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघ नेदरलँड्सविरुद्ध पराभूत झाला आणि त्यांचे उपांत्य सामन्याचे स्वप्न भंगले. अशात पाकिस्तानला अनपेक्षितपणे उपांत्य सामना खेळण्याची संधी मिळाली. ग्रुप स्टेमध्ये खेळताना भारत आणि झिम्बाब्वेविरुद्ध पारभव स्वीकारला असून एकूण तीन सामने जिंकले आहेत. ग्रुप दोनमध्ये पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर होता, तर भारतीय संघ या ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिला. टी-20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामन्यात बुधवारी पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये खेळला जाईल. त्यानंतर भारत आणि इंग्लंड संघ दुसऱ्या उपांत्य सामन्यात आमने सामने असतील. स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (13 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वेगवान गोलंदाजांच्या काळजीसाठी भारत एक पाऊल पुढे, रोहित-विराटने केला आपल्या बिझनेस क्लास सीटचा त्याग
भारतीय फलंदाजांना नडणाऱ्या ब्रेट लीबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?