सध्या भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. उभय संघातील टी20 मालिकेतील दुसरा सामना माऊंट मॉन्गुई येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 191 धावा धावफलकावर लावल्या. भारतासाठी सूर्यकुमार यादवने नाबाद शतक झळकावत सामना गाजवला. मात्र, अखेरच्या षटकात न्यूझीलंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज टीम साऊदी याने हॅट्रिक घेत मोठा पराक्रम केला.
नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा केन विलियम्सनचा निर्णय काहीअंशी योग्य ठरला होता. भारताचे सलामीवीर अडखळत खेळताना मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत. मात्र, सूर्यकुमार यादव याने त्यानंतर डावाची सूत्रे आपल्या हाती घेत, शानदार शतकी खेळी केली. एक वेळ भारतीय संघ सहजरित्या 200 धावांचा टप्पा पार करेल असे वाटत होते. मात्र, अखेरच्या षटकात टीम साऊदीने भारतीय फलंदाजांना वेसण घालण्याचे काम केले.
भारताच्या डावातील अखेरचे षटक टाकण्यासाठी आलेल्या साऊदीने या षटकात उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सादर केला. त्याने हार्दिक पंड्या, दीपक हुडा व वॉशिंग्टन सुंदर यांना बाद केले. यासह त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील दुसरी हॅट्रिक पूर्ण केली. यापूर्वी त्याने 2010 मध्ये पाकिस्तानविरुद्ध घेतलेली. यापूर्वी टी20 क्रिकेटमध्ये दोन हॅट्रिक घेण्याचा कारनामा केवळ श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने केला आहे. साऊदीने या सामन्यात चार षटके टाकताना 34 धावा देत तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
(Tim Southee Caim His Second T20I Hattrick Against India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संजूबाबत अश्विनची भविष्यवाणी ठरली खरी! भारताकडून पंतच्या आधी टी20 पदार्पण करूनसुद्धा दुर्लक्षित
रोहित- विराटच्या ‘त्या’ नकोशा विक्रमाच्या यादीत पंतही बसला मांडी घालून, बनला दुसराच खेळाडू