गुरुवारी (२९ जुलै) टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये पुरुष तिरंदाजीतील एकेरी गटात राऊंड १६ मधील सामना भारत आणि दक्षिण कोरिया संघात पार पडला. या सामन्यात भारताच्या अतनू दासने माजी ऑलिंपिक विजेत्या दक्षिण कोरियाच्या ओ जिन-हायकला ६-५ ने पराभूत केले. तसेच त्याने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र, हा सामना सुरू असताना एका व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ती म्हणजेच त्याची पत्नी आणि जगातील एक नंबरची महिला तिरंदाज दीपिका कुमारी होय.
हा सामना सुरू असताना दीपिका आपला पती आणि तिरंदाज अतनू दासला प्रोत्साहन देताना दिसली. ती स्टेडिअमवरूनच त्याच्यासाठी चिअर्स करत होती. तिचे हे प्रोत्साहन सार्थ ठरले आणि अतनूनेही या सामन्यात बाजी मारली. यादरम्यानचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे.
हा सामना खूपच रंजक होता. अतनू आणि हायक या दोन्ही खेळाडूंमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. तब्बल ३ सेट बरोबरीत सुटले. पहिल्या सेटमध्ये अतनूला २५-२६ ने पराभव स्विकारावा लागला. मात्र, पुढच्या दोन सेटमध्ये बरोबरी झाली. त्यानंतर चौथा सेट अतनूने २७-२२ ने जिंकला. मात्र, पाचव्या सेटमध्ये अतनू आणि हायकमध्ये पुन्हा २८- २८ अशी बरोबरी झाली.
https://www.instagram.com/p/CQ5z9n1A3UM/?utm_source=ig_web_copy_link
त्यानंतर शूटऑफमध्ये हायकने ९ गुण मिळवले, तर अतनूने १० गुण मिळवत हा पुरुषांचा वैयक्तिक राऊंड आपल्या आपल्या खिशात घातला.
#TeamIndia | #Tokyo2020 | #Archery
Men's Individual 1/16 Eliminations ResultsUnbelievable shoot-off by archer @ArcherAtanu to hit a 10🎯 to advance. Stuns former Olympic & World Champion Oh Jinhyek of South Korea. Bravoo champ!! #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/p6lp2Jcf9S
— Team India (@WeAreTeamIndia) July 29, 2021
दीपिकानेही केलाय उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
दीपिकाने पती अतनूपूर्वीच बुधवारी (२८ जुलै) महिला तिरंदाजीतील एकेरी गटात राऊंड १६ मधील सामन्यात विजय मिळवून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. दीपिकाने अमेरिकेच्या १८ वर्षीय जेनिफर फर्नांडिसला ६-४ पराभूत करत ही कामगिरी केली होती.
https://www.instagram.com/p/CRRVkGHgli9/?utm_source=ig_web_copy_link
मागील वर्षी बांधली लगीनगाठ
सन २०२० मध्ये टोकियो ऑलिंपिकनंतर अतनू दास आणि दीपिका कुमारी यांनी लग्न करण्याची योजना आखली होती. मात्र, कोरोना व्हायरसमुळे या स्पर्धा एक वर्षासाठी पुढे ढकलल्यानंतर त्यांनी आपली योजना बदलली आणि गेल्या वर्षी ३० जून रोजी त्यांचे लग्न झाले. दीपिकाच्या मूळ गावी रांची येथे गुपचूप हा सोहळा पार पडला.
दीपिका आणि अतनू या पती- पत्नीची जोडी सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि त्यांच्याकडून पदकाची अपेक्षा केली जात आहे. आता ते उपउपांत्यपूर्व फेरीत काय कमाल दाखवतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना
-जर्मन महिला जिम्नॅस्टच्या कपड्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; पण का?