भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना नुकताच मेलबर्न येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत ,पहिल्या सामन्यातील झालेल्या पराभवाची परतफेड केली आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ अशा प्रकारे पुनरागमन करेल ,अशी शक्यता क्रिकेट वर्तुळात फार कमी लोकांना होती. मात्र अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली.
या सामन्यात सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरला आपला पहिलाच कसोटी सामना खेळणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज. सिराजने दोन्ही डावात उत्तम गोलंदाजी करत 5 बळी मिळवले होते. अशातच ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेट खेळाडू टॉम मुडी यांनी सिराजचे कौतुक केले आहे.
एका ऑनलाईन कार्यक्रमामध्ये मुडी म्हणाले, “मोहम्मद सिराजकडे बघितल्यावर स्पष्ट कळते की आपण भविष्यातील एका उत्तम गोलंदाजाकडे बघत आहोत. सामान्य कुटुंबातून येणारा हा गोलंदाज आयपीएल खेळता-खेळता देशाकडून कसोटी सामना खेळतोय ही फार विशेष बाब आहे. माझ्या मते सिराज हा एक उत्तम खेळाडू असून तो गोलंदाजी करो अथवा क्षेत्ररक्षण, त्याचे लक्ष हे धावा वाचवण्याकडे असते. सिराजला संघातील आपल्या भूमिकेबद्दल पूर्णतः माहिती आहे “.
मुडी सिराजचे विशेष कौतुक करताना म्हणाले, “सिराज अतिशय वेगवान गोलंदाजी करतो, ज्यामुळे टॉप आर्डर खेळाडूंना त्याचा चेंडू खेळणे अवघड जाते. तो चेंडू स्विंग देखील करू शकतो. त्यामुळे सिराज हा भारतीय क्रिकेटसाठी एक उत्तम खेळाडू बनू शकतो.”
महत्त्वाच्या बातम्या –
संकट टळले! इंग्लंड संघाचे सर्व खेळाडू कोरोना निगेटिव्ह, लवकरच ‘या’ दौऱ्यासाठी भरणार उड्डाण
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी: २० वर्षीय प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली खेळणार सुरेश रैना, भुवनेश्वर कुमार
रहाणे-गिलचे जबरा शॉट पाहून पाँटिंगची बोलती बंद; म्हणाला, “ऑसी फलंदाजांमध्ये दमच नाही”