आयपीएल 2023 च्या 52 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले होते. जयपुर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अखेरच्या चेंडूवर हैदराबादने विजय संपादन केला. संघाच्या या विजयात युवा फलंदाज अब्दुल समद याने मोलाचा वाटा उचलला. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत सामना आपल्या संघाच्या बाजूने केला. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादचे माजी प्रशिक्षक टॉम मूडी यांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले.
यजमान राजस्थानने यशस्वी जयस्वाल, जोस बटलर व संजू सॅमसन यांच्या फलंदाजीमुळे 3 बाद 214 अशी मोठी धावसंख्या उभारली होती. त्याच्या प्रतिउत्तरात हैदराबादच्या सर्वच फलंदाजांनी उपयुक्त योगदान दिले. विजयासाठी अखेरच्या षटकात 17 धावांची गरज असताना युवा अब्दुल समदने अखेरच्या चेंडूवर षटकार वसूल करत, संघाला एक संस्मरणीय विजय मिळवून दिला. त्याने 7 चेंडूवर 17 धावा केल्या.
त्याच्या या कामगिरीनंतर बोलताना मूडी म्हणाले,
“अब्दुल समदकडे चेंडू मैदानाबाहेर मारण्याची क्षमता आहे. त्याला पाहून मला तरुणपणातील यूसुफ पठाण आठवतो. त्याच्याकडे ती क्षमता आणि ताकद आहे, जी एका फिनिशरकडे असायला हवी. मला अपेक्षा आहे की, ही खेळी त्याच्या कारकीर्दीला कलाटणी देणारी ठरेल.”
टॉम मूडी हे यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिले आहेत. त्यांनी यापूर्वी समदसोबत काम केले असून, ते यापूर्वी देखील त्याचे कौतुक करताना दिसले होते.
चालू हंगामात समदची कामगिरी त्याच्या नावारूपानुसार झालेली नाही. या हंगामात त्याने आतापर्यंत सहा सामने खेळताना केवळ 128 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे मोठ्या स्टाईल रेटसाठी ओळखल्या जाणाऱ्या समदला आपला स्ट्राइक रेट 128 पेक्षा पुढे नेता आला नाही. केकेआरविरुद्धच्या मागील सामन्यात अखेरच्या षटकात 9 धावा काढण्यात त्याला अपयश आलेले. यानंतर तो मोठ्या प्रमाणावर ट्रोल झालेला.
(Tom Moody Said Abdul Samad Remind Me Young Yusuf Pathan)
महत्वाच्या बातम्या-
नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुबमनचा दरारा! आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो नाहीतर आयपीएल, धावांचा पाडतोय पाऊस
रहाणेनंतर साहाला मिळणार का सेंकड चान्स? WTC फायनलआधी चर्चेला आला ऊत