भारतीय क्रिकेट बोर्ड हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. जेवढे इथे क्रिकेटचे चाहते पाहायला मिळतात. तेवढेच क्रिकेटला स्पॉन्सर करणारे व्यक्ति किंवा कंपनीही इथे पाहायला मिळतात. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटू हे कोणत्या बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा कमी श्रीमंत नसतात.
विशेष म्हणजे, एक क्रिकेटपटू वेगवेगळ्या मार्गांनी पैसे कमवत असतो. मग, यात त्याच्या सामना शुल्क आणि स्पॉन्सरशीपचा मुख्य समावेश असतो. तर, काही क्रिकेटपटूंना टिव्ही जाहिरातीद्वारे कोटींच्या संख्येत पैसे मिळतात. म्हणून क्रिकेटपटू त्यांना मिळालेल्या फावल्या वेळेत पैसे मिळवण्याच्या या संधीचा पुरेपुर लाभ उठवतात. Top 10 Richest Cricketers In The World.
जर, जगातील सर्वात क्रिकेटपटंविषयी पाहायचे झाले तर, सर्वात श्रीमंत १० क्रिकेटपटूंमध्ये ५ भारतीय क्रिकेटपटूंच्या नावांचा समावेश आहे. एवढेच नाही तर, टॉप-३ क्रिकेटपटू हे भारतीय संघातील आहेत. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा मास्टर ब्लास्टर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. तो तब्बल १५ मिलियन डॉलर म्हणजे ८७० कोटींचा मालक आहे.
सचिननंतर या यादीत भारताचा यशस्वी कर्णधार एमएस धोनीचा क्रमांक लागतो. तो एकूण १११ मिलियन डॉलर म्हणजे ८४० कोटींचा मालक आहे. धोनी हा क्रिकेटव्यतिरिक्त रिबॉक, गोडॅडी, टिव्हिएस मोटर्स, कोलगेट, स्निकर्स, सोनी ब्राविया, ओरिएंट आणि इतर अनेक ब्रॅंडच्या जाहिरातीद्वारे पैसे कमावतो.
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. फोबर्स २०१९च्या सर्वाधिक पैसे कमावणाऱ्या खेळाडूंच्या पहिल्या १०० जणांच्या यादीत विराट या एकमेव क्रिकेटपटूचा समावेश होता. तो गुगल, कोलगेट, पेप्सी, वॉल्वोलाइन, ऑडी इंडिया आणि उबरसारख्या मोठ्या ब्रँडची जाहिरात करतो. विराट हा ६९६ कोटींचा धनी आहे.
तर, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग हा ४९२ कोटींचा मालक आहे. आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सामाविष्ट असणारा ब्रायन लारा हा ४५४ कोटींसह या यादीत ५व्या क्रमांकावर आहे. त्याने क्रिकेट सोडल्यानंतर गोल्फ खेळून तिथून आपल्या कमाईत भर पाडली.
शिवाय, शेन वॉर्न, विरेंद्र सेहवाग, जॅक्स कॅलिस, युवराज सिंग आणि शेन वॉटसन यांचा जगातील सर्वात श्रीमंत १० क्रिकेटपटूंमध्ये समावेश आहे.
जगातील सर्वात श्रीमंत १० क्रिकेटपटू
सचिन तेंडुलकर – ८७० कोटी
एमएस धोनी – ८४० कोटी
विराट कोहली – ६९६ कोटी
रिकी पाँटिंग – ४९२ कोटी
ब्रायन लारा – ४५४ कोटी
शेन वॉर्न – ३९४ कोटी
विरेंद्र सेहवाग – ३०३ कोटी
जॅक्स कॅलिस – २६५ कोटी
युवराज सिंग- २६५ कोटी
शेन वॉटसन- २२७ कोटी