वनडेमध्ये आतापर्यंत अनेक भारतीय दिग्गज फलंदाजांनी आपले नाव केले आहे. आतापर्यंत २ वेळा भारताने वनडे विश्वचषक जिंकला आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने प्रथमच विश्वचषक जिंकला होता. २०११ मध्ये २८ वर्षानंतर भारताने पुन्हा एकदा एमएस धोनीच्या नेतृत्वात वनडे विश्वचषक जिंकला.
असे अनेक भारतीय फलंदाज आहेत ज्यांनी आतापर्यंत वनडे इतिहासात शानदार कामगिरी केली आहे. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, सौरव गांगुली, एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासह अनेक फलंदाजांनी वनडेमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे.
अनेक भारतीय फलंदाजांनी वनडेमध्ये शतकेही ठोकली आहेत. त्याचबरोबर बर्याच फलंदाजांनी अर्धशतके ठोकली आहेत. या लेखात तुम्हाला अशा ३ भारतीय फलंदाजांविषयी सांगणार आहोत ज्यांनी वनडेमध्ये सर्वाधिक वेळा पन्नास किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. जाणून घेऊया ते ३ फलंदाज कोण आहेत?
वनडे सामन्यात सर्वाधिक वेळा पन्नास अधिक धावा केलेले भारतीय फलंदाज
३.राहुल द्रविड (Rahul Dravid) – ९५ वेळा
या यादीत तिसर्या क्रमांकावर भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड आहे. १९९६ ते २०११ पर्यंत त्याने भारतीय संघासाठी एकूण ३४४ वनडे सामने खेळला आणि त्यातील ३१८ डावात त्याने ३९.१६ च्या सरासरीने १०८८९ धावा केल्या. राहुल द्रविडने वनडे कारकिर्दीत ९५ वेळा पन्नास किंवा अधिक धावा केल्या आहेत. यात त्याने ८३ अर्धशतके आणि १२ शतके ठोकली आहेत.
२००७ च्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ राहुल द्रविडच्या नेतृत्वात खेळला होता. त्या स्पर्धेत भारतीय संघ आधीच स्पर्धेबाहेर झाला होता. असे असूनही वनडे क्रिकेटमध्ये द्रविडचे योगदान विसरता येणार नाही. त्याने स्वतःहून अनेक सामने जिंकून दिले आहेत. जेव्हा जेव्हा संघाला गरज असायची, तेव्हा तेव्हा राहुल द्रविड संघासाठी उभा रहायचा.
२. विराट कोहली (Virat Kohli) – १०१ वेळा
या यादीत सध्याच्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या विराट कोहली हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात कोहलीची बॅट जोरदार बोलते.
विराट कोहलीने आतापर्यंतच्या वनडे कारकीर्दीत एकूण २४८ सामने खेळले असून २३९ डावांमध्ये ५९.३३ च्या प्रभावी सरासरीने ११८६७ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने आतापर्यंतच्या वन डे कारकीर्दीत ४३ शतके आणि ५८ अर्धशतकांसह १०१ वेळा पन्नास किंवा अधिक धावा केल्या आहेत.
१. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) – १८५ वेळा
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले. वनडेतील सर्वाधिक शतकांचा विक्रम घ्या किंवा धावांचा. तसेच याच मास्टर ब्लास्टरच्या नावावर क्रिकेटमधील आणखी एक खास विक्रम आहे.
सचिनने आपल्या कारकीर्दीत ४६३ वनडे सामने खेळताना ४४.८३ च्या सरासरीने १८४२६ धावा केल्या. हे सर्व करत असातना सचिनने ४९ शतके आणि ९६ अर्धशतकांसह तब्बल १४५ वेळा पन्नास किंवा अधिक धावा वनडे डावांत केल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या ५ फलंदाजांमध्ये पहिल्या दोन स्थानावर आहेत परदेशी क्रिकेटर
-आयपीएलमधील सर्वात वयस्कर मोहरे, ज्यांनी वयाला मागे टाकत केले कारनामे
-वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पन्नासपेक्षा अधिक धावा करणारे अव्वल ३ भारतीय फलंदाज
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळवणं नाही सोप्पं, नुसते नियम ऐकून तुम्हाला येईल टेन्शन
-झिवाच्या मांडीवरील छोटा मुलगा पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, काहींनी दिल्या धोनीला शुभेच्छा
-विराट कोहली म्हणजे कपडे घातलेला वाघ, संघसहकाऱ्याने केली विराटची थट्टा