जगात अनेक असे क्रिकेटपटू आहेत ज्यांचा खेळ हा कर्णधार झाल्यावर पहिल्यापेक्षा थोडा खालावतो. काही असेही खेळाडू असतात ज्यांचा खेळ कर्णधार झाल्यावर त्यांची कामगिरी जबरदस्त सुधारली आहे.
या लेखात कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार असताना सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांचा आपण आढावा घेणार आहोत. Top 5 cricketers with most centuries as Test captain.
५. स्टिव स्मिथ (१५ शतके)
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिवन स्मिथने ३४ सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्त्व केले. यात त्याने ७०.३६च्या सरासरीने ३६५९ धावा केल्या आहेत. यात त्याने ६० डावात फलंदाजी करताना १५ शतके व १३ अर्धशतके केली आहेत. कर्णधार झाल्यापासून त्याच्या कामगिरीत जबरदस्त सुधारणा झाली होती.
४. एलन बाॅर्डर (१५ शतके)
ऑस्ट्रेलियाचे माजी महान कर्णधार एलन बाॅर्डरने कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून १५ शतके केली आहेत. त्यांनी तब्बल९३ सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्त्व केले. त्यांनी १५४ डावात ५०.९४च्या सरासरीने ६६२३ धावा केल्या आहेत. यात त्यांनी १५ शतके व ३६ अर्धशतके केली आहेत.
३. रिकी पाॅटिंग (१९ शतके)
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाॅटींगने ७७ कसोटीत संघाचे नेतृत्त्व केले. यात त्याने १४० डावात फलंदाजी करताना ५१.५१च्या सरासरीने ६५४२ धावा केल्या. यात त्याच्या १९ शतके व ३६ अर्धशतकांचा समावेश आहे.
२. विराट कोहली (२० शतके)
५५ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्त्व केलेल्या विराट कोहलीने ९० डावात फलंदाजी करताना ६१.२१च्या सरासरीने ५१४२ धावा केल्या आहेत. विराटची कसोटी कारकिर्दही कर्णधार झाल्यावर कामगिरी सुधारली आहे. विराटने या ९० डावात २० शतके व १२ अर्धशतके केली आहेत. कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सध्या ६व्या स्थानावर आहे.
१. ग्रॅमी स्मिथ (२५ शतके)
तब्बल १०९ कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार राहिलेला व जगातील एक मोठा कसोटी कर्णधार समजल्या जाणाऱ्या ग्रॅमी स्मिथने १९३ डावात फलंदाजी करताना ४७.८८च्या सरासरीने ८६५९ धावा केल्या. यात त्याने २५ शतके व ३६ अर्धशतके केली आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-चहल म्हणतो, टीम इंडियाचे हे दोन शिलेदार बरोबर असतील तर महिनाभरही राहु शकतो लाॅकडाऊनमध्ये खुश
-जगातील ५ महान गोलंदाज, जे कधीही घेऊ शकले नाहीत वनडेत ५ विकेट्स
-मुंबई ड्रीम ११ टीम इंडियाच्या ऑल टाईम ११पेक्षाही भारी, पहा टीम