---Advertisement---

टाॅप ५- २०१८मध्ये क्रिकेटमध्ये काही होऊ न शकलेले विक्रम

---Advertisement---

मुंबई | २०१८ वर्ष खऱ्या अर्थाने भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांच्या नावावर राहिले. विराट कोहली, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्माने फलंदाजीत बहरदार कामगिरी केली तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, आर अश्विन, मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा चमकले.

असे असले तरी यावर्षी जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक विक्रम आहेत जे केवळ काही धावा किंवा विकेट्सने हुकले. त्यातील काही निवडक विक्रम- 

– विराट कोहलीला एकाच वर्षात १२ शतके करत आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या सचिनच्या विक्रमाची बरोबरी करण्याची मोठी संधी होती. यात विराट एकदा ९७ धावांवर बाद झाला तर एकदा ८२ धावांवर बाद झाला. यामुळे सलग दुसऱ्या वर्षी विराटने ११ शतके करत दुसऱ्या स्थानावर समाधान मानले आहे.

-२०१८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावा करणारा विराटनंतरचा दुसरा फलंदाज बनण्याची संधी जो रुटने गमावली. केवळ ६२ धावांनी त्याचे हे स्वप्न भंगले. यावर्षी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात त्याला २००० धावा पुर्ण करण्यासाठी ६९ धावांची गरज असताना तो ७ धावांवर बाद झाला.

-आंतरराष्ट्रीय धावांमध्ये २००० धावा पुर्ण करता न आलेला जो रुट कसोटीतही कमनशीबी ठरला. कसोटीत यावर्षी १ हजार धावा करणारा विराट कोहली आणि कुशल मेंडियपाठोपाठ तिसरा खेळाडू होण्याचे त्याचे स्वप्न अधुरे राहिले. त्याने यावर्षी ९४८ धावा केल्या.

-क्रिकेट जगतातील सर्वात मोठा विक्रम करण्याची विराट कोहलीची संधी सलग दुसऱ्या वर्षी हुकली. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्यासाठी विराटला १३३ धावा कमी पडल्या. २०१७मध्ये विराटने २८१८ तर यावर्षी २७३५ धावा केल्या आहेत. संगकारा या यादीत  २८६८ धावांसह अव्वल स्थानी आहे.

-कसोटीबरोबर वन-डेतही जो रुटला १ हजार धावा पुर्ण करण्याची मोठी संधी होती. परंतु रुटची ही संधी केवल ५४ धावांनी हुकली. त्याने यावर्षी २४ सामन्यात ९४६ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या:

टाॅप ५- टी२०मधील २०१८ वर्षातील गमतीशीर आकडेवारी

Video- यावर्षी टीम इंडियाच्या शिलेदारांचा हा व्हिडीओ झाला सर्वाधिक व्हायरल

स्म्रीती मानधना ठरली २०१८ ची आयसीसीची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू

मेलबर्न कसोटीतील विजयामुळे टीम इंडियाला झाला मोठा फायदा

-‘बाप’माणूस रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर

भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटवर प्रश्न उभा करणाऱ्यांना कर्णधार कोहलीने दिले सडेतोड उत्तर, पहा व्हिडिओ

 

 

3rd T20I Ajit Agarkar Asia Cup 2018 Australia vs india Bhuvneshwar Kumar cricket Delhi Daredevils dropped fastest 50 odi wickets icc T20 Rankings IND v WI 2018 India tour of Australia 2018 India vs Windies Indian Cricket Team IPL 2018 IPL 2019 JASPREET BUMRAH Jasprit Bumrah Kohli’s wrist injury Kuldeep Yadav Mohammed Shami Most fours in international cricket Mumbai Indians Rishabh Pant rohit sharma selectors Shikhar Dhawan Sunrisers Hyderabad virat kohli Windies Test series Yuzvendra Chahal अजित आगरकर आयपीएल २०१८ आयपीएल 2019 आयसीसी टी २० क्रमवारी आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत एमएस धोनी एशिया कप कसोटी संघातून वगळले कुलदीप यादव क्रिकेट गौतम गंभीर जलद 50 वनडे विकेट जसप्रीत बुमराह तिसरा टी20 सामना दिल्ली डेयरडेविल्स निवड समिती बीसीसीआय निवड समिती भारत विरुद्ध विंडिज भारत विरुद्ध विंडीज भारताचा आॅस्ट्रेलिया दौरा भारतीय क्रिकेट संघ भुवनेश्वर कुमार. मनगटाची दुखापत मोहम्मद अझरुद्दीन मोहम्मद शमी युजवेंद्र चहल युवराज सिंग राहुल द्रविड रिषभ पंत रोहित शर्मा विराट कोहली विरेंद्र सेहवाग व्हिव्हिएस लक्ष्मण शिखर धवन सचिन तेंडुलकर सर्वाधिक चौकार सुनील गावस्कर सौरव गांगुली

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment