क्रिकेटमध्ये सामन्यादरम्यान खेळाडूंना तहान लागते. यासाठी कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक 15 षटकानंतर ब्रेक असतो. सकाळी सामना सुरू झाला की पहिला ड्रिंक्स ब्रेक 15 षटकानंतर, पुढच्या 15 षटकानंतर लंच ब्रेक, त्यानंतर पुढच्या 15 षटकानंतर पुन्हा ड्रिंक्स ब्रेक त्यानंतरच्या 15 षटकानंतर टी ब्रेक व नंतरच्या 15 षटकानंतर पुन्हा ड्रिंक्स ब्रेक असे ठरलेले असते. असेच ब्रेक वनडे क्रिकेटमध्येही असतात. याची माहिती कसोटी सामन्याच्या तिकीटावर दिलेली असते.
या ब्रेक दरम्यान जुन्या काळात छोट्या गाड्या थेट मैदानात येत असतं. त्यात खेळाडूंसाठी पाणी ठेवलेले असे. त्यामुळे प्रायोजकांची जाहीरातही होतं असे. परंतु आता क्रिकेट अधिक वेगवान झाल्यामुळे अशा गाड्या मैदानात येत नाही. आता शक्यतो राखीव खेळाडूचं मैदानावर पाणी घेऊन येतात.
बऱ्याच वेळा राखीव खेळाडूचं सीमारेषेवर पाणी घेऊन थांबतात. काही वेळा सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या खेळाडूला तिथेच पाणी दिले जाते. ड्रींक्स ब्रेक्समध्ये येणारे खेळाडू हे एकप्रकारचे मेसेंजरही असतात. ते कर्णधार, संघव्यवस्थापन किंवा प्रशिक्षकाचा संदेश घेऊनही मैदानात येतात.
कधी कधी जर हेच खेळाडू ज्यांना वाॅटर बाॅय (Water Boy) म्हटले जाते ते सारखे सारखे मैदानावर येत असतील, तर पंच त्यांना येण्यास नकारही देतात. भारतासारख्या देशात एप्रिल, मे महिन्यात उष्णेतेमुळे खेळाडूंना सतत तहान लागते. त्यामुळे वाॅटर बाॅयचं काम खूप वाढतं.
क्रिकेटमध्ये असे अनेक महान खेळाडू आहेत ज्यांनी हे काम करताना कधीही आढेवेढे घेतले नाहीत. या लेखात आपण अशा खेळाडूंची माहिती घेणार आहोत.
5. युवराज सिंग
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 3 ऑगस्ट 2010 रोजी कोलंबो येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग (Yuvraj Singh) याने ‘वॉटरबॉय’ म्हणून जबाबदारी पार पडली होती. यावेळी काही श्रीलंकन चाहत्यांनी युवराजची थट्टा केल्यामुळे तो भडकला होता. धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात त्या वेळी युवराजला त्या कसोटी सामन्यात संधी मिळाली नसल्या कारणाने त्याने ही जबाबदारी पार पडली होती. हा सामना भारताने 5 विकेटने जिंकला होता.
4. विराट कोहली
मार्च 2017 मध्ये धरमशाला येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याने ‘वॉटरबॉय’ची जबाबदारी पार पडली होती. दुखापतीमुळे विराट या सामन्यात खेळू शकला नाही. त्या वेळी त्याचे फोटो मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. विशेष म्हणजे, भारताने हाही सामना 8 विकेट्सने जिंकला होता. यादीत विराटचा पुन्हा समावेश करावा लागेल. कारण, विराट कोहली याने 29 एप्रिल, 2023 रोजी बार्बाडोस येथे पार पडलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यातही ‘वॉटर बॉय’ची जबाबदारी पार पाडली. या सामन्यातून तो बाहेर होता. हा सामना भारताला 6 विकेट्सने गमवावा लागला.
Virat Kohli is the perfect waterboy for Indian Cricket Team 👏👏#ViratKohli #RohitSharma𓃵 pic.twitter.com/Q9ttopQKN3
— Peeyush (Rohit ka Pariwar) (@CricAudit) July 29, 2023
https://twitter.com/indiantweetrian/status/1685506554391576577
3. एमएस धोनी
भारतीय संघाने 2018मध्ये दोन टी20 सामन्यांची मालिका आयर्लंडविरुद्ध आयर्लंडमध्ये खेळली होती. यातील दुसऱ्या सामन्यात ‘कॅप्टन कूल’ एमएस धोनी (MS Dhoni) याला विश्रांती देण्यात आली होती. यावेळी धोनी वाॅटरबाॅय म्हणून मैदानात पाणी घेऊन गेला होता. भारताने हा सामना 143 धावांनी जिंकला होता.
एमएस धोनीने ‘वॉटरबॉय’ म्हणून जबाबदारी पार पाडलेला हा काही पहिलाच सामना नव्हता. यापूर्वीही त्याने ही जबाबदारी पार पाडली आहे. 30 मे 2017 मध्ये बांगलादेश विरुद्ध भारत सामन्यात भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधाराने ही जबाबदारी पार पडली. विशेष म्हणजे भारताने हाही सामना 240 धावांनी जिंकला. धोनीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये सुद्धा ही जबाबदारी पार पडली आहे.
2. सचिन तेंडुलकर
सन 2004 साली भारताचा वंडर बॉय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) बेंगलोर कसोटीमध्ये ‘वॉटरबॉय’ बनला होता. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघात दुखापतीमुळे सचिन खेळला नव्हता. विशेष म्हणजे, विरुद्ध टीममध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगसुद्धा खेळत नसल्याकारणाने कर्णधार म्हणून ऍडम गिलख्रिस्ट जबाबदारी पार पाडत होता. भारत या सामन्यात तब्बल 247 धावांनी पराभूत झाला होता.
um no… pic.twitter.com/So4RzApgqr
— Nikhil Mane 🏏🇦🇺 (@nikhiltait) March 25, 2017
Sarfaraz is now the company of Bradman, Kohli and Ponting. https://t.co/eYH12xEeFK pic.twitter.com/XRfGRhLM5q
— Mazher Arshad (@MazherArshad) August 6, 2020
1. सर डॉन ब्रॅडमन
आजपर्यंतचे सर्वात महान क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन (Sir Don Bradman) यांनीही ‘वॉटरबॉय’ची जबाबदारी पार पाडली आहे. 1928 साली झालेल्या एका कसोटी सामन्यात त्यांनी ही जबाबदारी पार पाडली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
गजबच! ब्रॉड बनला अँडरसनच्या कारकीर्दीत निवृत्त होणारा आठवा खेळाडू, यादीत 2 भारतीयांचाही समावेश
आता विश्वचषक विसरा! 247 दिवसांनंतर मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात फेल ठरला संजू, नेटकरीही संतापले