रविंद्र जडेजाच्या आधी या खेळाडूला संघसहाकरी म्हणायचे सर
गावसकरांनी भारताचे माजी दिग्गज फिरकीपटू गोलंदाज एस. वेंकटराघवन (S. Venkataraghavan) यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी खरा ‘सर’ (Sir) म्हटले आहे. वेंकटराघवन यांनी मंगळवारी आपला ७५वा वाढदिवस साजरा केला होता. याच निमित्ताने गावसकरांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत वेंकटराघवन यांच्या बरोबरच्या आठवणींना उजाळा दिला.
टीममध्ये निवड न झाल्यामुळे रात्रभर रडला होता विराट, या व्यक्तीला विचारली होती कारणं
अनअकॅडेमीने (Unacademy) मंगळवारी (२१ एप्रिल) ऑनलाईन सेशनचे आयोजन केले होते. विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी यशस्वी होण्याअगोदरच्या आपल्या आयुष्याबद्दल सांगितले.
याबद्दल बोलताना विराटने (Virat Kohli) सांगितले की, “राज्यस्तरीय संघात पहिल्यांदा माझी निवड झाली नव्हती. त्यावेळी मी रात्री ते आठवून रडत बसायचो. त्या रात्री मी जवळपास ३ वाजेपर्यंत रडलो होतो. यावर माझा विश्वास बसत नाही.”
कॅप्टन कूल धोनी पुन्हा कर्णधार, टीम इंडिया नाही तर संघात मिळाली संधी
सिडलच्या या कसोटी संघात भारतीय संघाच्या २ खेळाडूंना संधी मिळाली आहे. यामध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांंचा समावेश आहे.
विशेष म्हणजे सिडलने आपल्या सर्वकालीन ११ जणांच्या प्रतिस्पर्धी कसोटी संघाच्या नेतृत्वाची आणि यष्टीरक्षणाची जबाबदारी धोनीला सोपविली आहे.
कॅप्टन कूल धोनी पुन्हा कर्णधार, टीम इंडिया नाही तर संघात मिळाली संधी
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या कारकीर्दीला योग्य वळण देणाऱ्या गोलंदाजांचा खुलासा केला आहे. या गोलंदाजांपैकी एक गोलंदाज हा भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आहे. तर दुसरा गोलंदाज हा पाकिस्तान संघाचा माजी महान गोलंदाज वसीम अक्रम आहे.
पृथ्वी शाॅ म्हणतो, या फलंदाजाबरोबर सलामीला फलंदाजीला जरा जास्तच मजा येते
इंडियन प्रिमियर लीगमध्ये (आयपीएल) दिल्ली डेअरडेविल्स हा एकमेव असा संघ आहे, जो आतापर्यंत एकदाही अंतिम सामन्यात पोहोचलेला नाही. तसेच, त्यांना बाद फेरीत जाण्यातही यश मिळाले.
काही वर्षांच्या खराब प्रदर्शनानंतर अखेर २०१९मध्ये दिल्ली डेअरडेविल्सला (Delhi Daredevils) एका नव्या रुपात पाहायला मिळाले. त्यांनी संघाचे नाव बदलून दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) ठेवले. पुढे नावाबरोबरच त्यांच्या प्रगतीही झाले. याला कुठे ना कुठे कारणीभूत होता दिल्लीचा रहिवासी शिखर धवन (Shikhar Dhawan).
ट्रेंडिंग घडामोडी –
रविंद्र जडेजाच्या आधी या खेळाडूला संघसहाकरी म्हणायचे सर
टीममध्ये निवड न झाल्यामुळे रात्रभर रडला होता विराट, या व्यक्तीला विचारली होती कारणं
असे ३ वनडे सामने, जिथं गांगुली स्लो खेळला आणि टीम इंडियाला पराभव पहावा लागला