---Advertisement---

बापरे! केवळ १५ तासांत होणार ३ आंतरराष्ट्रीय सामने, भारत ऑस्ट्रेलिया वनडे सामन्याने सुरुवात

On: शुक्रवार, नोव्हेंबर 27, 2020 12:01 PM
---Advertisement---

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बरेच दिवस जगभरात क्रिकेट सामन्यांचे आयोजन होऊ शकले नाही. मात्र आता सर्व खबरदारी घेऊन जैव सुरक्षित वातावरणात क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. यातच शुक्रवारी (27 नोव्हेंबर) एक नव्हे, तर तब्ब्ल 3 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होणार आहे. त्यामुळे शुक्रवारचा दिवस क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.

हे तीन सामने होणार –

• भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला वनडे सामना शुक्रवारी सिडनी क्रिकेट मैदानावर होत आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9:10 वाजता सुरु झाला आहे.

• वेस्टइंडिज क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला टी20 सामना शुक्रवारी ऑकलँड येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 11:30 वाजता खेळला जाईल.

• सध्या इंग्लंड क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर होणाऱ्या 3 टी20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी केप टाऊन येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 9.30 वाजता खेळला जाईल.

या तिन्ही सामन्यांच्या नियोजित वेळेकडे नजर टाकल्यास असे लक्षात येईल की 15 तासात हे तीनही सामने संपन्न होणार आहे. सकाळी 9 ते रात्री 12 या कालावधीत 1 वनडे आणि 2 टी20 सामने खेळले जाणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी शुक्रवार हा दिवस नक्कीच खास असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---