आज(22 डिसेंबर) बाराबती स्टेडियम, कटक येथे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात तिसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यातून भारताकडून 27 वर्षीय नवदीप सैनीने वनडे पदार्पण केले आहे. वनडे पदार्पण करणारा तो भारताचा 229 वा खेळाडू आहे.
तसेच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वनडे पदार्पण करणारा एकूण 14 वा खेळाडू आहे. विशेष म्हणजे विराटच्या नेतृत्वाखाली पदार्पण केलेल्या या 14 खेळाडूंमध्ये पदार्पणावेळी 26 वर्षांपेक्षा जास्त वय असलेला सैनी हा 7 वा खेळाडू ठरला आहे. सैनीचे वय सध्या 27 वर्षे 29 दिवस एवढे आहे.
भारतीय कर्णधारांपैकी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 31 खेळाडूंनी वनडे पदार्पण केले त्यातील 5 खेळाडूंचे वय पदार्पणावेळी 26 वर्षांपेक्षा जास्त होते. तर राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली 9 खेळाडूंनी वनडे पदार्पण केले. त्यातील केवळ 1 खेळाडू पदार्पणावेळी 26 वर्षांपेक्षा जास्त वयाचा होता.
त्याचबरोबर सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली वनडे पदार्पण केलेल्या 30 खेळाडूंपैकी 4 खेळाडूंचे वय 26 वर्षांपेक्षा अधिक होते.
वाढते वय ही समस्या नाही, केकेआरने काहीतरी पाहिले म्हणूनच मला खरेदी केले – प्रविण तांबे
वाचा- 👉https://t.co/iZvvfkM82R👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi@MarathiRT #IPL2020Auction
— Maha Sports (@Maha_Sports) December 22, 2019
केवळ ९ धावा करताच रोहित शर्मा मोडणार २२ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम
वाचा- https://t.co/jAGh1OcPNb#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi@MarathiRT #INDvWI
— Maha Sports (@Maha_Sports) December 22, 2019