IPL 2024 Auction: इंडियन प्रीमिअर लीग 2024 लिलाव दुबई येते 19 डिसेंबर रोजी पार पडत आहे. या लिलावात एकापेक्षा एक खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. त्यात भारतीय संघाला मोठ्या स्पर्धांमध्ये नेहमीच नडणारा ऑस्ट्रेलियाचा ‘बिग मॅच प्लेअर’ ट्रेविस हेड याच्या नावाचाही समावेश होता. सुरुवातीला हेडवर बोली लावण्यासाठी कोणताच संघ तयार नव्हता. मात्र, सनरायझर्स हैदराबाद संघाने पहिली बोली लावली. त्यानंतर त्याच्यावरील बोली वाढत गेली. अखेरीस हैदराबाद संघानेच हेडला आपल्या ताफ्यात सामील केले.
ट्रेविस हेडला किती लागली बोली?
ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ट्रेविस हेड (Travis Head) याने या आयपीएल 2024 लिलावात (IPL 2024) 2 कोटी रुपयांची बेस प्राईज ठेवली होती. त्याला संघात घेण्यासाठी हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि चेन्नई (Chennai Super Kings) संघात चढाओढ लागली होती, पण अखेरीस हैदराबादने (SRH) त्याला 6.80 कोटी रुपयात आपल्या संघाचा भाग बनवले.
आयपीएलचा कमीच अनुभव
तसं पाहिलं तर, ट्रेविस हेड याला आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव कमी आहे. तो शेवटचा 7 वर्षांपूर्वी आयपीएल खेळला होता. तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा भाग होता. त्याने आरसीबीकडून 2016 आणि 2017 असे 2 हंगाम खेळले. यादरम्यान त्याने पहिल्या हंगामात 3 सामन्यात फक्त 54 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2017च्या हंगामात त्याने 7 सामने खेळताना 30.20च्या सरासरीने 151 धावा केल्या होत्या.
अशाप्रकारे हेडने दोन्ही हंगामातील एकूण 10 सामन्यात 29.29च्या सरासरीने 205 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून फक्त 1 अर्धशतक निघाले आहे. नाबाद 75 ही त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या आहे. (Travis Head sold to Sunrisers Hyderabad 6.80 crore in ipl 2024)
हेही वाचा-
IPL लिलावाच्या इतिहासातील Most Expensive Players, फक्त 7 नावे भारतीय; हंगामानुसार पाहा यादी
IPL 2024 New Rule: गोलंदाजांसाठी लागू होणार ‘हा’ मोठा नियम! फक्त ऐकूनच उडेल फलंदाजाचा थरकाप