---Advertisement---

जेव्हा ट्रेंट बोल्ट चक्क कांद्यावर करतो स्वाक्षरी, पहा व्हिडिओ

---Advertisement---

ख्राईस्टचर्च। 29 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान हेगली ओव्हल स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यादरम्यान न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट चाहत्याच्या विनंतीनुसार चक्क कांद्यावर स्वाक्षरी देताना दिसून आला आहे.

सध्या बोल्टचा कांद्यावर स्वाक्षरी देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान बाऊंड्री लाईन बाहेर बोल्ट चाहत्यांनी आणलेल्या बॅटवर, कॅपवर स्वाक्षरी करत होता. यादरम्यान काही चाहते ‘कांद्यावर स्वाक्षरी कर’, असे ओरडत होते.

हे सर्वपाहून बोल्टनेही कोणताही संकोच न करता हसून कांद्यावर स्वाक्षरी केली आणि तो पुन्हा मैदानात गेला.

बोल्टने भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीत चांगली कामगिरी केली. त्याने या सामन्यात 6 विकेट्स घेतल्या. हा सामना भारताने 7 विकेट्सने गमावला. त्याचबरोबरच न्यूझीलंड विरुद्धची ही 2 सामन्यांची कसोटी मालिकाही भारताने 2-0 ने गमावली.

या संपूर्ण मालिकेत बोल्टने एकूण 11 विकेट्स घेतल्या. या मालिकेत तो सर्वाधिक विकेट्स घेणारा टीम साऊथी नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे.

बोल्ट कसोटी मालिकेआधी न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या मर्यादीत षटकांच्या मालिकांमध्ये दुखापतीमुळे खेळला नव्हता.

महत्त्वाच्या बातम्या-

विश्वचषकाचा उपांत्य सामना खेळण्याआधी ऑस्ट्रेलियाला जबरदस्त मोठा धक्का

तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या त्या खेळाडूला रोहित शर्माने केला हा मेसेज

‘थाला’ धोनीला पाहण्यासाठी चपॉक स्टेडियमवर चाहत्यांची गर्दी; धोनीची सरावाला सुरुवात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---