मुंबई इंडियन्सने आयपीएल 2021 मधील आपल्या दुसर्या थरारक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा 10 धावांनी पराभव केला.या सामन्यात गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे मुंबईने केकेआरला 152 धावा करण्यापासून रोखले आणि विजय मिळवला. राहुल चाहर, कृणाल पंड्या, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट हे या विजयाचे नायक ठरले. मुंबईने या सामन्यातील विजयाचा आनंद त्यांच्या ड्रेसिंग रूममध्येही साजरा केला.
मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, बुमराह आणि कृणाल पंड्या यांची ‘सामनावीर’ म्हणून निवड झाली. यानंतर या सर्वांनी भाषणही केले. या भाषणात बोल्टने ‘पुन्हा मला फलंदाजी करायची नाही’, असे एक मजेदार विधान केले. या सामन्यात मुंबईची फलंदाजी कोलमडल्याने शेवटी बोल्टलाही फलंदाजीला यावे लागले म्हणून बोल्टने हे विधान केले.
दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2018 च्या लिलावात बोल्टला 2.20 कोटी रुपयांना खरेदी केले होते. परंतु, आयपीएल 2020 च्या अगोदर दिल्ली कॅपिटल्सशी ट्रेड करून मुंबईने त्याला आपल्या ताफ्यात सामील केले.
केकेआरचा पराभव केल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये तो म्हणाला की, “शेवटच्या क्षणी सामना जिंकलो हे चांगले झाले. त्यातून खूप काही चांगले धडे शिकायला मिळाले. याच्यासह आपण स्पर्धेत पुढे जाऊ. पण कृपया मला पुन्हा फलंदाजीसाठी पाठवू नका. ठीक आहे? मला फलंदाजी करायची नाही.”
त्याच्या वक्तव्यानंतर मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये हास्यकल्लोळ झाला. केकेआरविरुद्ध त्याने शेवटच्या षटकात 15 धावा वाचविल्या. या दरम्यान, त्याने सलग दोन चेंडूंमध्ये आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्सला बाद केले होते.
Here's what our players had to 🗣️ after being adjudged as the Dressing Room Players of the Match 😋💪#OneFamily #MumbaiIndians #MI #KKRvMI #IPL2021 @surya_14kumar @trent_boult @Jaspritbumrah93 @krunalpandya24 pic.twitter.com/41LXuoDGJS
— Mumbai Indians (@mipaltan) April 14, 2021
त्याचवेळी, ड्रेसिंग रूममध्ये कृणाल पंड्याने पुन्हा एकदा आयपीएल चषक जिंकण्याची उत्सुकता दाखवली. तो म्हणाला, “आपण कधीही हार मानत नाही, यासाठी तर आपण प्रसिद्ध आहोत. संघाने उत्कृष्ट प्रयत्न करत आपण जगातील सर्वोत्तम का आहोत हे दाखवून दिले आहे. ही तर केवळ एक सुरुवात असून चषक जिंकणे हे आपले अंतिम लक्ष्य आहे.”
यानंतर जसप्रीत बुमराह या विजयाबद्दल बोलताना म्हणाला की, “आपला पहिला झालेला विजय पाहून आनंद झाला. यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे सामान्यात आपण चुका केल्या. परंतु, त्यांचा आपण आपल्या खेळावर परिणाम होऊ दिला नाही. आपण जोर लावून शेवटी सामना जिंकला आणि या चुकांपासून आपण शिकलो आणि आपल्यात सुधारणा केल्या.”
महत्त्वाच्या बातम्या –
“तू आता जास्त आक्रमक नाही राहिला, त्यामुळे…” पंजाबविरुद्धच्या लढतीपुर्वी गंभीरने धोनीला दिले ज्ञान
व्हिडिओ: १२ लाखांच्या दंडाच्या भितीने पंतला फुटला घाम; पंचांना म्हणाला, “तो एक मिनिट तुम्हीच घेतला”
निर्णायक क्षणी कर्णधार पंतने अश्विनवर दाखवला नाही विश्वास, इथेच झाली चुक; प्रशिक्षकाची कबुली