भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणे सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. पण मागच्या काही दिवसांमध्ये त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत स्वतःची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली. त्याने रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामातील पाच सामन्यांमध्ये 532 धावा केल्या आहेत. यादरम्यान रहाणेची सरासरी 76 धावांची राहिली. रहाणेने दिल्ली संघासोबतच्या सामन्याआधी माध्यमांशी चर्चा करताना स्वतःच्या फलंदाजीविषयी मोहत्वाची माहिती दिली.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्यासाठी रणजी ट्रॉफीचा चालू हंगाम आतापर्यंत खूपच चांगला गेला आहे. त्याने स्वतःच्या प्रदर्शनासाठी विचारसरणीत काही महत्वाचे बदल केल्याचे रहाणे म्हणाला. दिल्ली रणजी संघाविरुद्ध मैदानात उतरण्याआधी रहाणेने हा खालासा केला. “मी जुन्या दिवसांचा विचार करत होतो. जेव्हा मी पहिल्यांदा रणजी संघात आलो होतो (2007). त्यावेळी मी कसा खेळायचो, कसा विचार करायचो, त्यानुसार मी पुन्हा योजना बनवण्याचा प्रयत्न करत आहे, मला तो अजिंक्य रहाणे बनायचं आहे, जो कारकिर्दीतील सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी होतो,” असे रहाणे म्हणाला.
मागच्या वर्षी अजिंक्य रहाणेला संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात संधी दिली नव्हती. आता रहाणेने देखील मान्य केले आहे की, त्याच्या खेळीत काही बदल नक्कीच झाले आहेत. तो पुढे बोलताना म्हणाला,”तुम्हाला एका खेळाडूच्या रूपात नेहमी चांगले प्रदर्शन करावे लागते. खेळाडूंनी स्वतःच्या रणनीतीवर काम करावे लागते आणि सुधारणा सुरूच ठेवावी लागते. आता मला मुंबई संघासाठी विचार करावा लागेल आणि त्यांच्यासाठी चांगेल प्रदर्शन करावे लागेल. माझ्या डोक्यात पूर्णपणे हाच विचार सुरू आहे. मी स्वतःच्या फलंदाजीविषयी जास्त विचार करत नाहीये, पण सराव खूप महत्वाचा असतो. रणजी हंगामाआधीची तयारी देखील चांगली राहिली आहे.”
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघ घोषित केला. यामध्ये सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला टी-20 आंतरराष्ट्रीय संघात निवडले गेले आहे. तर दुसरीकडे मागच्या दोन रणझी ट्रॉफी स्पर्धांमध्ये 900 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या सरफराज खान (Sarfaraz Khan) याला मात्र संघात जागा बनवता आली नाही. याविषयी बोलताना रहाणे म्हणाला, “त्यांना माझा सरळ सल्ला आहे की, ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रनात आहेत, त्याकडे लक्ष द्या. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्याकडे जास्त लक्ष देऊ नका.” रहाणेने भारतासाठी 82 कसोटी सामने खेळले असून या फॉरमॅटमध्ये त्याचा अनुभव मोठा आहे. त्याने कसोटी संघासोबत खेळताना 4931 धावा केल्या आहेत. असे असले तरी, जानेवारी 2022 नंतर त्याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाहीये. (Trying to be the Ajinkya I was in my initial days Says Ajinkya Rahane)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात जिगरा! चेंडू टाकताच पळत सुटला गोलंदाज, फलंदाजाला दाखवला तंबूचा रस्ता; पाहा व्हिडिओ
क्रिकेटमध्ये डब्ल्यूडब्ल्यूई? उथप्पाला ग्रीन बेल्टसोबत पाहताच चाहत्यांना पडला प्रश्न, नेमकी भानगड काय?