तुर्कीमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे झालेला विध्वंस संपूर्ण जग पाहत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली असून, हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला. लाखो लोक बेघर व गायब झाले आहेत. तसेच अद्यापही काही लोक भूकंपामुळे बनलेल्या ढिगाऱ्यांखाली गाडले गेल्याचा संशय व्यक्त होतोय. केवळ सर्वसामान्यांनाच नव्हे तर अनेक प्रतिष्ठित लोकांना देखील या भूकंपाचा मोठा त्रास सहन करावा लागला. या भूकंपात तुर्कीने आपला एक आश्वासक फुटबॉलपटू गमावला आहे. या भूकंपात 28 वर्षीय गोलरक्षक अहमत इयुप तुर्कस्लानचाही मृत्यू झाला.
Inna lillah wa inna ilayhi raaji'uun
you were a good guy super nice respectful happy to have been able to know you. ALLAH grant you paradise ameen #AhmetEyupTurkaslan 💔🙏🏾 pic.twitter.com/y91u6HfzXa
— Moussa Sow Officiel (@19Sow) February 7, 2023
तुर्कीमध्ये दोन दिवसात 40 पेक्षा जास्त भूकंप झाल्याने देशभरातील विविध भागांमध्ये अतोनात हानी झाली. तुर्कीसह शेजारच्या सीरियामध्ये देखील अशाच प्रकारे भूकंपाने मानवी जीवनावर घात केला. तुर्कीत येनी मालत्यास्पोर फुटबॉल क्लबसाठी खेळणारा अहमत इयुप हा देखील या भूकंपात मृत्यू पावला. त्याच्याच क्लबने याबाबतची पुष्टी केली. 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपात तो ढिगार्याखाली दबला व 7 फेब्रुवारी रोजी त्याचे शव मिळाले.
अहमत इयुप हा मागील दहा वर्षांपासून वरिष्ठ स्तरावरील फुटबॉल मध्ये खेळत होता. त्याने आतापर्यंत पाच विविध संघांचे प्रतिनिधित्व केलेले. यादरम्यान त्याने 87 सामने खेळले. अनेकदा तो राष्ट्रीय संघाच्या शिबिरात देखील सहभागी झाला होता. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्याचा विवाह देखील झालेला.
त्याच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर, सहकारी खेळाडूंनी दुःख व्यक्त केले. आम्ही त्याला आडगाव मध्ये खूप मिस करू अशी भावना खेळाडूंनी व्यक्त केली.
(Turkey earthquake: Yeni Malatyaspor goalkeeper Ahmet Eyup Turkaslan dies)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘सूर्यामध्ये मला कपिल देव दिसतात’, माजी प्रशिक्षकाने केली दिलखुलास स्तुती
हरमन-स्मृतीसह ‘या’ 24 जणी उतरणार सर्वोच्च बेस प्राईसने WPL लिलावात, 409 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर