---Advertisement---

अर्जून तेंडूलकरमुळे भारतीय संघात घराणेशाहीचे दर्शन! चाहत्यांचा हल्लाबोल

On: मंगळवार, जून 26, 2018 3:00 PM
---Advertisement---

भारतीय संघ सध्या 3 महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दरम्यान काल, 25 जूनला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जूनने भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या बरोबर काही वेळ घालवला.

शास्त्रींनी अर्जूनला या भेटीत काही टीप्स दिल्या तसेच मार्गदर्शन केले. याचा फोटो बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे.

मात्र  बीसीसीआयच्या या ट्विटवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. चाहत्यांनी टीका करताना म्हटले आहे की भारतीय संघात घराणेशाही होत आहे. तसेच अर्जूनप्रमाणे बाकी खेळाडूंना ही संधी का दिली जात नाही.

अर्जूनने याआधीही अनेकदा भारतीय संघाला नेटमध्ये गोलंदाजी केली आहे. तसेच 2017मध्ये त्याने लॉर्डसच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्याआधी नेटमध्ये गोलंदाजी होती. यावरुन त्याचे अनेकांनी कौतुक केले होते. मात्र त्याचबरोबर अनेकांनी यावर टीकाही केली होती.

काही दिवसांपूर्वीच अर्जुन तेंडूलकरची 19 वर्षाखालील भारतीय संघात श्रीलंका दौऱ्यातील चारदिवसीय सामन्यांसाठी निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल अगदी आयसीसीनेही दखल घेतली होती.

या दौऱ्यासाठी तो डब्ल्यूव्ही रमण आणि सनथ कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये होणाऱ्या 19 वर्षांखालील कॅम्पसाठी उपस्थित राहणार आहे.

https://twitter.com/Vijaygu2APR/status/1011242741353701381

https://twitter.com/shreyasbh8/status/1011262689304367104

https://twitter.com/nat_asp/status/1011347892810887169

महत्त्वाच्या बातम्या-

या खास कारणामुळे केदार जाधवने मानले पत्नीचे आभार

-Breaking- पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची निवृत्तीची घोषणा

-कबड्डी मास्टर्स: चार दिवसांत भारताकडून पाकिस्तानची दोन वेळा धुळदान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment