---Advertisement---

‘विराट एकवेळ जार्वोला संधी देईल, पण अश्विनला नव्हे’, ओव्हल कसोटीसाठीच्या संघनिवडीवर चाहते भडकले

On: शुक्रवार, सप्टेंबर 3, 2021 12:48 AM
---Advertisement---

ओव्हलच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू आहे.या सामन्यात भारतीय संघात दोन मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा यांना संघाबाहेर करून उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर यांना संधी देण्यात आली आहे. तर आर अश्विनला पुन्हा एकदा संघात संधी देण्यात आली नाही.

चौथ्या कसोटीत आर अश्विनला संधी दिली जाईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु, त्याला पुन्हा एकदा संघाबाहेर करण्यात आले आहे. दरम्यान, चाहत्यांनी देखील सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आर अश्विन हा भारतीय संघातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. परंतु, इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत त्याला अद्याप एकाही सामन्यात संधी देण्यात आली नाही.

तिसऱ्या कसोटी सामन्यात गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरी नंतर चौथ्या सामन्यांत अश्विनला संधी दिली जाईल, अशी चर्चा होत होती. परंतु, भारताने फिरकी गोलंदाजीसाठी केवळ रविंद्र जडेजावरच विश्वास दाखवला. संघव्यवस्थापनाने ने घेतलेल्या या निर्णयावर चाहते निराश झाले आहे.

एका युजरने ट्विट करत रवी शास्त्री आणि विराट कोहलीला अश्विनला संघात स्थान न दिल्याबद्दल जाब विचारला आहे. त्याने लिहिले की,”विराट कोहली आणि रवी शास्त्री मला सांगा की, अश्विन या संघात का नाही?”

तर, दुसऱ्या एका युजरने सूर्यकुमार यादव आणि आर अश्विनला प्लेइंग इलेव्हेनमध्ये स्थान न दिल्याबद्दल, आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याने लिहिले की, “मला तर आश्चर्य वाटत आहे की, प्लेइंग इलेव्हेनमध्ये सूर्यकुमार यादवही नाही आणि आर अश्विनही नाही.”

अश्विनला संधी न दिल्यामुळे एका युजरने थेट कर्णधार बदलण्याचा सल्ला दिला आहे. या युजरने ट्विट करत लिहिले की, “विराट कोहली जार्वोला (सामना सुरू असताना मध्ये घुसलेला प्रेक्षक) संधी देईल, परंतु, तो अश्विनला संधी देणार नाही. भारताला आता नवीन कर्णधाराची गरज आहे.”

https://twitter.com/ShinChan5993/status/1433367503254667268?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1433367503254667268%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportskeeda.com%2Fcricket%2Find-vs-eng-twitter-reactions-after-dropping-ravichandran-ashwin-in-4th-test

https://twitter.com/DilwarS94463298/status/1433367494715002881?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1433367494715002881%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportskeeda.com%2Fcricket%2Find-vs-eng-twitter-reactions-after-dropping-ravichandran-ashwin-in-4th-test

https://twitter.com/JosePuliampatta/status/1433367489283379208?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1433367489283379208%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportskeeda.com%2Fcricket%2Find-vs-eng-twitter-reactions-after-dropping-ravichandran-ashwin-in-4th-test

https://twitter.com/DS124789/status/1433367478059474944?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1433367478059474944%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportskeeda.com%2Fcricket%2Find-vs-eng-twitter-reactions-after-dropping-ravichandran-ashwin-in-4th-test

चौथ्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हेन: रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

महत्त्वाच्या बातम्या – 

ओव्हलचे मैदान दमदार फलंदाजीने गाजवणारे ३ भारतीय फलंदाज, शास्त्रींचाही समावेश

चौथा कसोटी सामना ओव्हलवर, पाहा काय सांगतो या मैदानावरील नाणेफेकीचा इतिहास

ईशांतच्या आवाजाची नक्कल करत युवराजने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---