भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्या टी-२० सामन्यात विजय मिळवत तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने दिलेले १९५ धावांचे आव्हान भारताने १९.४ षटकांत पूर्ण केले. शिखर धवन (५२) आणि हार्दिक पंड्या (४२*) हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. त्यांना साथ देताना भारतीय कर्णधार विराट कोहलीनेही २४ चेंडूत ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. मात्र, त्याच्या खेळीपेक्षा सोशल मीडियावर त्याने खेळलेल्या स्कूपच्या फटक्याचीच अधिक चर्चा झाली.
एबी डिविलियर्सशी केली तुलना
भारतीय संघ फलंदाजी करताना १५ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर विराट कोहलीने अँड्रयू टायच्या गोलंदाजीवर शॉर्ट फाइन लेगला अफलातून षटकार मारला. आपल्या नैसर्गिक स्वभावाविरुद्ध त्याने खेळलेला हा स्कूपचा फटका पाहून समालोचकांसह सगळेच अचंबित झाले. हा फटका पाहून सोशल मीडियावर अनेकांनी त्याची तुलना दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिविलियर्सशी केली. डिविलियर्स हा फटका नियमितपणे खेळत असल्याने आरसीबीकडून खेळताना विराटने त्याच्याकडून हा फटका शिकून घेतला असावा, अशी मजेशीर टिप्पणीही काही जणांनी केली.
पाहा ट्विटरवर उमटलेल्या प्रतिक्रिया-
https://twitter.com/mastiyaapa/status/1335547666340716545
@ABdeVilliers17 will be proud of this shot ❤❤❤@imVkohli#indvsausT20#INDvsAUS #viratkholi pic.twitter.com/Xo4oDGfESg
— Jethalal Bhai (@Jethalalbhai) December 6, 2020
https://twitter.com/ImNaveenAcharyy/status/1335548570552832000
https://twitter.com/perth_169/status/1335549690192908289
भारताने या सामन्यासह मालिकाही टाकली खिशात
सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या दुसर्या टी-२० सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने टी-२० मालिकेवर कब्जा केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने कर्णधार मॅथ्यू वेडचे अर्धशतक आणि स्टीव स्मिथच्या ४६ धावांच्या खेळीच्या बळावर १९४ धावा काढल्या. भारताकडून टी नटराजन २० धावांत २ बळी घेत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर शिखर धवनने अर्धशतक रचत संघाच्या विजयाचा पाया रचला. कर्णधार विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांनी अनुक्रमे ४० आणि ४२* धावा काढत भारताचा विजय निश्चित केला.
महत्त्वाच्या बातम्या-
दुर्दैव म्हणतात ते हे! विराटकडून झेल सुटूनही ऑस्ट्रेलियन कर्णधार झाला रनआऊट, पाहा Video
‘बर्थडे बॉय’ श्रेयस अय्यरने टिपला अफलातून झेल, पाहा Video
ट्रेंडिंग लेख-
मराठीत माहिती- क्रिकेटर जसप्रीत बुमराह
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
मराठीत माहिती- क्रिकेटर श्रेयस अय्यर