आयपीएल स्पर्धेपूर्वी झालेल्या इंग्लंड संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेत गोलंदाजीमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आर अश्विनने विराट कोहलीला कित्येकदा डीआरएस घेण्याची मागणी केली होती आणि त्याचे ऐकून विराट डीआरएस घेतदेखील होता. आयपीएलच्या १४ व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नेतृत्त्वाची सूत्रे रिषभ पंतच्या हाती आहेत. तसेच आर अश्विनदेखील या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. मंगळवारी (२० एप्रिल) मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अश्विनने डीआरएससाठी जोरदार मागणी करूनही ती मागणी पंतने फेटाळून लावल्याचे चित्र दिसून आले. ज्यावर अनेकांनी मजेशीर ट्विट करत प्रतिक्रीया दिल्या आहेत.
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यातील दुसरे षटक टाकण्यासाठी पंतने अश्विनला गोलंदाजीसाठी बोलावले होते. या षटकातील चौथ्या चेंडूवर रोहित शर्माने रोहित शर्माने स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो चेंडू त्याच्या पॅडला जाऊन धडकला होता.
त्यानंतर अश्विन आणि पंतने जोरदार मागणी केली होती. ही मागणी अंपयारने नाकारली होती. तरीही अश्विनला वाटत होते की तो बाद आहे. यामुळे अश्विनने पंतकडे डीआरएस घेण्याची मागणी केली होती. परंतु त्याने डीआरएस घेण्यास नकार दिला होता.
https://twitter.com/lodulalit001/status/1384513761587843075?s=20
यानंतर अनेकांनी ट्विट करत आपल्या मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘काय अश्विनला डीआरएस नाही घेऊ दिला? पंतला विनवणी करणे तर कोहलीपेक्षा ही कठीण आहे.’ पुढे त्याने हसण्याच्या ईमोजी टाकले होते.
What Ashwin didn’t get a review? Pant is harder to convince than Kohli.😂😂
— Cricketologist (@AMP86793444) April 20, 2021
तसेच दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘आश्चर्यचकित झालो मी, अश्विन आणि रिषभ डीआरएस वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.’
Amazed watching pant and ashwin are not wasting reviews!!
— kalmdownkriii (@kReetweets) April 20, 2021
https://twitter.com/mendiratta_arav/status/1384509689216462849?s=20
https://twitter.com/exhaustednd/status/1384510137621049344?s=20
What did I just see, Ashwin not interested in taking a review??? Rare scenes 😂#IPL #DCvMI
— Prayagg (@Pag1401) April 20, 2021
https://twitter.com/galwithnochill/status/1384509904078082052?s=20
Two brilliant calls by Pant behind stumps to not to take DRS, excellent considering one was Ashwin.
— Johns. (@CricCrazyJohns) April 20, 2021
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १३७ धावा केल्या होत्या. यात रोहित शर्माने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली होती. तसेच ईशान किशनने २६ आणि सूर्यकुमार यादवने २४ धावांचे योगदान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना, दिल्ली कॅपिटल्स संघाकडून शिखर धवनने सर्वाधिक ४५ धावांची तुफानी खेळी केली होती. तसेच स्टीव्ह स्मिथने देखील ३३ धावांचे योगदान दिले होतें. शेवटी ललित यादवने नाबाद २२ आणि शिमरन हेटमायरने नाबाद १३ धावा करत हा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाला ६ गडी राखून जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्ली-मुंबई लढतीत रोहित शर्माला दुखापत, पुढील सामना खेळणार की नाही? पाहा काय म्हणाला
एवढे मोठे क्रिकेटर असलेले कपिल देव ‘या’ व्यक्तीला घाबरुन कुठे-ना-कुठे लपण्यासाठी जागा शोधायचे
पुन्हा रंगली ‘मांकडिंग’ची चर्चा, लाईव्ह सामन्यात पोलार्डने धवनला दिली चेतावणी; व्हिडिओ व्हायरल